वाहतूक नियमांचं उल्लंघन केल्यावर पोलीस चलान फाडतात. मग वाहन मालकाला दंड भरावा लागतो. पोलिसांनी नंबर नोंदवल्यावर पुढचं सगळं ऑनलाईनच होतं. पण बंगळुरूतील काही तरुणांनी चलान टाळण्यासाठी शक्कल शोधून काढली. वाहतूक नियमांचं उल्लंघन करताना लपवता येईल अशी नंहर प्लेट त्यांनी तयार केली.

पोलिसांनी शेअर केलेल्या व्हिडीओत आरोपी दिसत आहेत. पोलिसांच्या कॅमेऱ्यांपासून नंबर प्लेट लपवून दंड कसा चुकवता येतो ही बाब आरोपी स्वत:च सांगत आहेत. ऑनलाईन चलान टाळता यावेत यासाठी हा सगळा प्रकार जाणुनबुजून केल्याची कबुली आरोपींनी दिली आहे.
आणखी एका पोस्टमधून उपायुक्तांनी काही दुचाकीस्वारांनी नोंदणी क्रमांकात फेरफार केल्याचं सांगितलं. हा प्रकारदेखील दंड भरावा लागू नये म्हणून करण्यात येत आहे. ‘नियम मोडणारे आणि नियम मोडल्यावर पोलिसांच्या नजरेतून सुटण्याचा प्रयत्न करणारे अशा दोन्ही प्रकारच्या लोकांवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल,’ असं कुमार म्हणाले.
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.