नाशिक : सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी भाविकांनी विविध देवस्थानांवर गर्दी केल्याचं चित्र आहे. नाशिक जिल्ह्यातील सप्तशृंगी मातेच्या मंदिर परिसरात देखील भाविकांनी गर्दी केली आहे. विशेष म्हणजे सप्तशृंगी देवीचे मंदिर आज २४ तास खुले असणार आहे.

सालाबादप्रमाणे नव्या वर्षाची सुरुवात अनेक भाविक भक्त श्री क्षेत्र सप्तशृंगगड येथे श्री भगवतीच्या दर्शनाने करतात. त्यामुळे श्री क्षेत्र सप्तशृंगगड येथे नववर्षाच्या दरम्यान भाविक-भक्तांची प्रचंड गर्दी लोटते. यावर्षी नववर्षाच्या स्वागतासाठी नेहमीपेक्षा जास्त गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मंदिर देवस्थानच्या वतीने येणाऱ्या भाविकांची गर्दी विभागली जावी आणि सर्वांना सहजतेने भगवती दर्शन घेता यावे यासाठी नुतन वर्ष प्रारंभास विविध राज्यातून येणाऱ्या भाविक-भक्तांसाठी श्री भगवती मंदिर २४ तास खुले ठेवण्यात येणार आहे.

शिंदे गटात बिघाडी? मंत्रिपद न मिळालेल्या नेत्याचाच माझ्याविरोधात कट, सत्तार यांचा गौप्यस्फोट

शिर्डीचे साईबाबा मंदिर, वाणीची सप्तशृंगी माता आणि इतरही मंदिरांत भाविक भक्तांची अलोट गर्दी झाली आहे. अनेक भक्त पालख्या घेऊन पवित्र स्थळांवर दाखल होत आहेत. सप्तशृंगी मातेच्या मंदिराच्या नियमित वेळेप्रमाणे सर्व काही होणार असून भाविकांना करोना नियमांचे पालन करण्यासाठी मास्क सक्ती करण्यात आलेली आहे. आज नव्या वर्षाच्या स्वागताला या ठिकाणी प्रचंड गर्दी असेल. त्यामुळे मास्क बंधनकारक असणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here