रेयानला एकदा कामावरून काढून टाकण्यात आलं. त्यानंतर तो पुन्हा एकदा त्याच्या कारमधून सँडविच आणायला गेला. त्यानंतर त्याला नोकरीवरून काढण्यात आलं. या कारवाईविरोधात रेयाननं खटला दाखल केला. कंपनीला नोटीस पाठवली. कामगार लवादानं रेयानच्या बाजूनं निकाल दिला. त्यामुळे बीएमडल्ब्यूला १७ लाख रुपये भरपाई द्यावी लागली. आपल्या वर्णावरून भेदभाव केला गेल्याचा आरोप रेयाननं केला. वर्णभेद करून मला त्रास देण्यात आल्याचा दावा त्यानं केला. मात्र हा दावा फेटाळून लावण्यात आला.
प्रकरण काय?
रेयाननं जून २०१८ मध्ये कामगार लवादात धाव घेतली. त्यावेळी रेयानच्या सुपरवायझरनं त्याच्याविरोधात अहवाल दिला होता. रविवारी ओव्हरटाईम असताना नाईट शिफ्टच्यावेळी रेयान गायब होता, अशी माहिती या अहवालात होती. रात्री ७.५० ते ८.४५ या वेळेत रेयान कंपनीत नव्हता. त्याची माहिती त्यानं आपल्या वरिष्ठांना दिलेली नव्हती, असं कंपनीचं म्हणणं होतं.
तीन दिवसांनंतर रेयानच्या बॉसनं यासंदर्भात त्याच्याकडे विचारणा केली. त्यावर काम संपवून ब्रेकमध्ये बर्गर किंगमध्ये गेलो होतो. तिथून परतल्यावर सुपरवायझरनं मला हटकलं. न सांगता गेलो असं त्यांचं म्हणणं होतं. पण मी सांगून गेलो होतो, असा प्रतिवाद रेयाननं केला. मी तासाभरानंतर आलो. पण त्याबदल्यात मी तासभर थांबून कामही केलं. माझ्याप्रमाणेच आणखी एक कर्मचारीही गायब होता. मात्र त्याच्यावर काहीच कारवाई झाली नाही, असा युक्तिवाद रेयाननं केला.
कंपनीतील शिस्तपालन समितीनं या प्रकरणावर सुनावणी घेतली. रेयानला कामावरून काढण्यात आलं. यासंदर्भात लिखित उत्तर दिल्यावर त्याच्या पुन्हा कामावर घेण्यात आलं. मात्र त्यानंतर त्याला पुन्हा कामावरून कमी करण्यात आलं. रेयान न सांगता साईट सोडून गेल्याचा आरोप करण्यात आला. यानंतर रेयाननं कामगार लवादाकडे दाद मागितली. निर्णय त्याच्या बाजूनं लागला.