Nagpur Crime News : अन्न व औषधी प्रशासन विभाग आणि कामठी (जुने) पोलिसांच्या (Nagpur Police) संयुक्त पथकाने खैरी (ता. कामठी) शिवारातील फ्रेंड्स ट्रान्सपोर्टच्या गोदामात धाड टाकली. यात बनावट डिझेलसह 22 लाख 82 हजार 900 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणात अद्याप कुणालाही ताब्यात घेण्यात आले नाही, हे विशेष.
खैरी शिवारात असलेल्या फ्रेंड्स ट्रान्सपोर्टच्या गोदामात बनावट डिझेल तयार करून ते बाजारात विकले जात असल्याची माहिती कामठी (जुने) पोलिसांना मिळाली होती. त्यामुळे पोलिसांनी याबाबत अन्न व औषधी प्रशासन विभागातील अधिकाऱ्यांना सूचना दिली आणि नंतर संयुक्तरीत्या धाड टाकली.
यात 28 हजार 200 रुपयांचे तीन हजार लिटर बनावट डिझेल, मोटरपंप, मोजमाप साहित्य असा एकूण 22 लाख 82 हजार 900 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, गोदाम सील करण्यात आले, अशी माहिती अन्न व औषधी प्रशासन विभागातील अधिकारी पंकज पंचभाई व ठाणेदार दीपक भिताडे यांनी संयुक्तरीत्या दिली. याप्रकरणी कामठी (जुने) पोलिसांनी भादंवि 285, अत्यावश्यक वस्तू, कायदा 1955 अन्वये गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.
आरोपीवर अहवालानंतर कारवाई
News Reels
- गुन्हा कुणाविरुद्ध दाखल करण्यात आला, ते गोदाम कुणाच्या मालकीचे आहे, यात किती जणांचा सहभाग आहे. हे देखील पोलिसांनी अद्याप स्पष्ट केले नाही.
- या डिझेलचे नमुने नागपूर शहरातील शासकीय प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे.
- वृत्त लिहीपर्यंतही या प्रकरणात कुणालाही अटक करण्यात आली नाही किंवा ताब्यात घेण्यात आले नाही.
- त्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर संबंधित व्यक्त्तीला अटक करून पुढील कारवाई केली जाईल, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
पोलिसांच्या धडक कारवाईने खळबळ
प्राप्त माहितीनुसार ट्रान्सपोर्टच्या या गोदामात अनेक महिन्यांपासून बनावट डिझेलची निर्मिती करण्यात येत होती. तसेच सुरुवातीला काही खास ग्राहकांनाच डिझेल देण्यात येत होते. मात्र नंतर खुल्या बाजारतही मागणी येईल त्याप्रमाणे याची विक्री जारोत सुरु होती. याबाबत परिसरात दबक्या आवाजात चर्चा सुरु होती. मात्र तरी कारवाई होत नसल्याने नागरिकांकडून ‘अर्थकारण’ असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत होता. मात्र अचानक पोलीसांनी केलेल्या धडक कारवाईमुळे बनावट डिझेलचा साठा करणारे, तसेच खुली विक्री करणाऱ्यांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत.
ही बातमी देखील वाचा…