नवी दिल्ली: संपूर्ण जग आशावादी नजरेने पहात आहे. कारण मोकळेपणा, संधी आणि पर्यायांच्या उत्कृष्ट समन्वयाला भारत महत्त्व देत आहे. भारत आपल्या नागरिकांना आणि कारभारामध्ये मोकळेपणाला प्रोत्साहन देतोय. आत्मनिर्भर भारत अभियानामुळे केवळ भारतच नव्हे तर जगातील समृद्धीचा मार्ग मोकळा होईल, असं म्हणाले. यूएस-इंडिया बिझिनेस कौन्सिलने आयोजित केलेल्या ”मध्ये पंतप्रधान मोदी बोलत होते. तंत्रज्ञान, शेती, ऊर्जा, पायाभूत सुविधा, नागरी उड्डाण, संरक्षण आणि अवकाश, वित्त आणि विमा क्षेत्रात गुंतवणूक करण्याचं आवाहन अमेरिकन कंपन्यांना पंतप्रधान मोदींनी केले.

करोनाच्या संकटातून अर्थव्यवस्था वाचवण्याचा मंत्र

कोरोना व्हायरसच्या संसर्गामुळे जागतिक अर्थव्यवस्थेला मोठा झटका बसला आहे, याकडे पंतप्रधानांनी लक्ष वेधलं. अर्थव्यवस्थेला कोरोनासारख्या संकटातून वाचविण्याचा मंत्र त्यांनी दिला. ‘जागतिक अर्थव्यवस्था एफिशियन्सी आणि ऑप्टिमायझेशनवर अधिकच केंद्रीत आहे. कार्यक्षमता ही चांगली गोष्ट आहे, परंतु या दिशेने जाताना महत्त्वाच्या मुद्यांकडे काहीसं दुर्लक्ष झालं आहे. या पैकी एक मत्त्वाचा मुद्दा म्हणजे बाह्य आपत्कालीन समस्यांना निष्प्रभ करणं, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.

जगाच्या समृद्धीत आत्मनिर्भर भारताचे योगदान असेल

‘आपत्कालीन परिस्थितीतून जागतिक अर्थव्यवस्थेला पूर्णपणे सुरक्षित करण्यासाठी आपल्याला देशांतर्गत आर्थिक क्षमता बळकट करावी लागेल. म्हणजेच आपल्याला वित्तीय व्यवस्था सुधारित करावी लागेल आणि उत्पादन वाढवून आंतरराष्ट्रीय व्यापाराला बहुआयामी बनवावे लागेल. आत्मनिर्भर भारत अभियानाने केवळ भारतच नव्हे तर जागतिक अर्थव्यवस्थेला बळकटी मिळू शकेल. सध्याच्या प्रतिकूल परिस्थितीतही जगाला समृद्ध करण्यासाठी आपल्या ‘आत्मनिर्भर भारत अभियाना’च्या माध्यमातून भारत योगदान देत आहे. यासाठी आम्ही तुमच्या भागिदारीच्या प्रतीक्षेत आहोत, असं मोदी म्हणाले.

भारतात अनेक संधी: मोदी

पंतप्रधान मोदींनी अमेरिकेला विविध क्षेत्रांमध्ये गुंतवणूक करण्याचे निमंत्रण दिले. गेल्या सहा वर्षांत आम्ही आपली अर्थव्यवस्था अधिक खुली करण्यासाठी आणि ती सुधारण्यासाठी अनेक प्रयत्न केले आहेत. या सुधारणांमुळे स्पर्धा, पारदर्शकता, डिजिटलायझेशन आणि नाविन्यपूर्णतेला चालना मिळाली. त्याच वेळी धोरणांमध्ये स्थिरता आणली, असं मोदींनी सांगितलं.

भारत संधींचा देश म्हणून उदयास येत आहे. आपण तंत्रज्ञान क्षेत्राचं उदाहरण देऊ या. नुकताच भारतात एक रंजक अहवाल समोर आला आहे. पहिल्यांदाच गावांमध्ये इंटरनेट वापरणाऱ्यांचे प्रमाण हे शहरांपेक्षा अधिक आहे, असं या अहवालात म्हटलं गेलंय. 5 जी तंत्रज्ञान, बिग डेटा अॅनालिटिक्स, क्वांटम कम्प्युटींग, ब्लॉक चेन आणि इंटरनेट ऑफ थिंग्जमध्येही संधी निर्माण होतील, असं मोदी म्हणाले.

भारतात कुठे आहेत गुंतवणूकीच्या संधी?

कृषी क्षेत्रात भारताने ऐतिहासिक सुधारणा केल्या आहेत. येथील कृषी क्षेत्रात गुंतवणूकीच्या बर्‍याच संधी आहेत. यामध्ये शेतीसाठी लागणारा खर्च, शेतीची यंत्रे आणि उपकरणे, कृषी पुरवठा साखळी व्यवस्थापन, रेडी टू इट आयटम्स, मत्स्यपालन आणि सेंद्रीय शेतीत गुंतवणूक करता येईल. भारतात आरोग्य क्षेत्रातही गुंतवणुकीची अनेक शक्यता आहेत. येथील आरोग्य क्षेत्रात दरवर्षी २२ टक्क्यांहून अधिक वाढ होत आहे, असं मोदी म्हणाले.

ऊर्जा क्षेत्रातही गुंतवणुकीच्या संधी आहेत. भारतीय कंपन्यांसाठी येथे मोठ्या संधी आहेत. पायाभूत क्षेत्रातील गुंतवणूकीसाठी भारत आपल्यालाही आमंत्रित करतो. देशाच्या इतिहासात सर्वात मोठी पायाभूत सुविधांचे अभियान भारतात सुरू आहे. लक्षावधी किंवा कोट्यावधी घरे, रस्ते किंवा महामार्ग किंवा बंदरे, अमेरिकन कंपन्या यात सहभागी होऊ शकतात, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here