Maharashtra Politics | खासदार संजय राऊत यांनी भाजपकडून लव्ह जिहादच्या मुद्द्यावरुन सुरु असलेल्या राजकारणाच समाचार घेतला. लव्ह जिहादचा वापर केवळ हिंदू समाजात भय पसरवण्यासाठी केला जात असावा, अशी शक्यता संजय राऊत यांनी बोलून दाखवली. महाराष्ट्रात या काळात लव्ह जिहादविरोधात मोठे मोर्चे काढण्यात आले. मुळात लव्ह जिहादची व्याख्या ठरवली पाहिजे, असे राऊत यांनी म्हटले.

 

Shinde Fadnavis govt Sanjay Raut
संजय राऊतांची टीका

हायलाइट्स:

  • जात, धर्म आणि त्यावरून तणाव हे चित्र परवडणारे नाही
  • हिंदू आणि मुसलमानांत कायमचे वैर हे देशाला नव्या फाळणीकडे ढकलत आहे
मुंबई: महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार पाडणे हा राजकीय बळजोरीचा प्रकार होता. सत्तेचा गैरवापर करून शिवसेना पक्ष फोडण्यात आला. मावळत्या वर्षात महाराष्ट्राने एक बेकायदेशीर सत्तांतर पाहिले. लोकशाही आणि भारतीय घटनेचा कोणताही विधिनिषेध न बाळगता राजकारण करणारे देशाला अराजकतेकडे ढकलत आहेत. शिंदे गटातील १६ आमदारांना सर्वोच्च न्यायालयाने अपात्र ठरवले तर नव्या वर्षात राज्यातील बेकायदा सरकार घरी गेलेले दिसेल, असे वक्तव्य खासदार संजय राऊत यांनी केले आहे. सामनातील ‘रोखठोक’ या सदरातून संजय राऊत यांनी महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना शिंदे गट आणि भाजपवर निशाणा साधला आहे.

सर्वत्र जात, धर्म आणि त्यावरून तणाव हे चित्र परवडणारे नाही. हिंदू आणि मुसलमानांत कायमचे वैर हे देशाला नव्या फाळणीकडे ढकलत आहे. जगात कोणीच अमर नाही हे लक्षात घेतले तर मोदी व शहांनी देशात द्वेषाची आणि फाळणीची बीजे रोवू नयेत, असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे. तसेच लव्ह जिहादच्या मुद्द्यावरुन भाजप नेत्यांकडून केल्या जाणाऱ्या राजकारणावरी संजय राऊत यांनी टीका केली.श्रद्धा वालकर या तरुणीची हत्या करणारा तरुण मुसलमान होता. मुंबईतील एक सिनेकलाकार तुनिषा शर्मा हिने प्रेमभंग झाल्यावर सेटवर आत्महत्या केली. तिचाही प्रियकर मुसलामन हे खरे, पण सर्वच जातीधर्मातील स्त्रियांवर अत्याचार होतात, हे विसरता येणार नाही. त्यामुळे या सगळ्याला लव्ह जिहाद म्हणता येणार नाही. महाराष्ट्रात या काळात लव्ह जिहादविरोधात मोठे मोर्चे काढण्यात आले. मुळात लव्ह जिहादची व्याख्या ठरवता यायला हवी. उद्याच्या निवडणुकीत जिंकण्यासाठी व हिंदू मतदारांमध्ये भय निर्माण करण्यासाठी लव्ह जिहादचे हत्यार वापरले जात आहे का? हिंदूंना जागे करणे हाच सत्तधारी भाजपचा एकमेव अजेंडा आहे. पण हिंदूंना जागे करणे म्हणजे समाजात व धर्मात द्वेष फैलावणे असे नाही, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
शिंदेंच्या मनात संघ विचारांचा रेशीम कीडा पूर्वीपासूनच वळवळतोय, उद्या सभागृहात खाकी पँट घालून येतील: संजय राऊत

भाजप रेवड्या वाटून मतदारांना पंगू करतेय: राऊत

देशात भूक, गरिबी आणि बेरोजगारी याच खऱ्या समस्या आहेत. देशातील ८१ कोटी ३५ लाख लोकांना फुकट अन्न देऊन जगवावे लागत आहे. ही प्रगती नसून घसरण आणि विफलता आहे. नव्या वर्षात भूक आणि गरिबीच्या समस्येची तीव्रता कमी झाली पाहिजे. त्यासाठी विरोधी पक्ष आणि सत्ताधाऱ्यांमध्ये एकमत झाले पाहिजे. विरोधी पक्ष देशाच्या राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावू शकतात, ही बाब सत्ताधाऱ्यांनी मान्य केली पाहिजे, असे संजय राऊत यांनी म्हटले.

एकनाथ शिंदेंविरोधातील पुरावे दिल्लीतील महत्त्वाच्या व्यक्तींकडे, फडणवीस घाईघाईने आले; राऊतांचा गौप्यस्फोट

अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी शिंदे-फडणवीस सरकार पडेल: अमोल मिटकरी

राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानपरिषदेतील आमदार अमोल मिटकरी यांनी येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी शिंदे-फडणवीस सरकार कोसळेल, असा दावा केला आहे. २० फेब्रुवारीपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु होत आहे. तोपर्यंत राज्यातील सरकार गेलेले दिसेल, असे मिटकरी यांनी म्हटले. गेल्या काही दिवसांमध्ये महाविकास आघाडीचे नेते सातत्याने शिंदे-फडणवीस सरकार लवकरच कोसळेल, असे दावे करत आहेत. राज्य सरकारचे भवितव्य हे सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीवर अवलंबून आहे. न्यायालय कोणाच्या बाजूने निकाल देते, यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here