Authored by पवन येवले | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 1 Jan 2023, 1:19 pm

Nashik Fire News : नाशिकमध्ये भीषण घटना घडली आहे. जिंदाल कंपनीत स्फोट होऊन आग लागली आहे. काही कामगार या घटनेत जखमी झाल्याचं सांगण्यात येत आहे. आग इतकी मोठी आहे की कित्येक किलोमीटर दूरवरून ती दिसत आहे.

 

jindal poly films plant fire in igatpuri nashik
नाशिकमध्ये जिंदाल कंपनीत आधी स्फोट, मग भडकली आग; काही जण गंभीर जखमी झाल्याची माहिती
नाशिक : नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच नाशिकमध्ये भीषण घटना घडली आहे. नाशिकजवळ असलेल्या इगतपुरीतील मुंढेगावजवळ जिंदाल समूहाची कंपनी आहे. जिंदालच्या या कंपनीत आज सकाळच्या सुमारास मोठा स्फोट झाला. जिंदाल समूहाच्या पोलिफिल्मची निर्मिती करणाऱ्या या कंपनीत आधी स्फोट झाला आणि या स्फोटमुळे आग लागली. आगीमध्ये काही कामगार गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. काही कर्मचारी हे आत अडकल्याचंही सांगण्यात येत आहे. पोलिसह घटनास्थळी दाखल झाले आहेत. या घटनेची माहिती मिळताच पालकमंत्री दादा भुसे हे रवाना झाले आहेत.

इगतपुरी तालुक्यातील मुंढेगाव येथे जिंदाल कंपनीत मोठी आग लागली. जिंदालच्या अग्निशमन विभागासह महिंद्रा अँड महिंद्रा, घोटी टोलनाका येथील अग्निशमनच्या बंबांकडून आग नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. नाशिक महापालिकेचे बंबही आग नियंत्रणात आणण्यासाठी मुंढेगावकडे रवाना झालेत. नाशिक ग्रामीण अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आहेत. आगीचे लोळ दूरवर दिसत होते.

दरम्यान, घटनास्थळावर बचाव कार्य सुरू असून परिसरात या घटनेने एकच खळबळ उडाली आहे .तर परिसरात मोठा प्रमाणात घबराटीचे वातावरण निर्माण झालेले आहे. कंपनीत लागलेली भीषण असून कंपनीतीलच काम करणारे काही कामगार होरपळून जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. पण अद्यापही आगीचे कारण समजू शकलेले नाही. कंपनीला भीषण आग लागल्याने छोटे छोटे स्फोट होत असल्याची माहिती आहे.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here