Pune Zomato order :   पुण्याच्या एका ग्राहकाने वर्षभरात (Pune Zomato order)  चक्क 28 लाख रुपये झोमॅटोवरुन जेवण ऑर्डर करण्यासाठी खर्च केले. झोमॅटोने जाहीर (zomato year report) केलेल्या वर्षभराच्या अहवालातून (Food delivary) ही माहिती समोर आली आहे. तेजस असं या ग्राहकाचं नाव आहे. त्यासोबतच ग्राहकांनी यावर्षी मोठ्या प्रमाणात खर्च केला आहे.  त्यात एकाने एकाच ऑर्डरमध्ये 25,000 रुपयांपेक्षा जास्त किमतीचे पिझ्झा ऑर्डर केले, असंही या अहवालातून समोर आलं आहे.

झोमॅटोच्या 2022 ट्रेंड रिपोर्टनुसार, बिर्याणी (Biryani हा सर्वात आवडता खाद्य पदार्थ होता. 2022 मध्ये झोमॅटोच्या ग्राहकांनी प्रत्येक मिनिटाला 186 बिर्याणीची ऑर्डर दिली. स्विगीवरही हा सर्वाधिक ऑर्डर केलेला पदार्थ होता, असं त्यांनी दावा केला होता. त्यानंतर या वर्षी झोमॅटोवर दुसरा सर्वात लोकप्रिय खाद्यपदार्थ पिझ्झा होता. 2022 मध्ये पिझ्झा प्रेमींनी दर मिनिटाला 139 ऑर्डर केले आहे. रविवारी झोमॅटोवर अनेक ऑफर्स असतात. या ऑफर्सचा अनेकांनी लाभ घेतला आहे. त्यात एकूण 6 लाख रुपयांची बचत केली आहे. 

झोमॅटो अॅपवरुन 3300 वेळा जेवण केलं ऑर्डर 

दिल्लीतील एका ग्राहकाने या वर्षी झोमॅटो अॅपवरुन 3300 वेळा जेवण ऑर्डर केलं आहे. तर दुसऱ्या ग्राहकाने वर्षभरात 1,098 केक ऑर्डर केले आहेत. सुरत मधील एका ग्राहकाने झोमॅटोने पाठवलेल्या धन्यवादाच्या मेसेजवर संताप व्यक्त केला आहे. दरवेळी जेवण ऑर्डर केल्यावर झोमॅटो कंपनीकडून धन्यवादचा मेसेज येतो या मेसेजला हा ग्राहक वैतागला आणि त्याने झोमॅटो कंपनीवर संताप व्यक्त केला आहे. 

स्विगीच्या अहवालात काय होतं?

काही दिवसांपूर्वी स्विगीनेही त्यांचा वार्षिक अहवाल सादर केला होता. त्यातही अनेक खवय्यांचे गमतीशीर किस्से होते. बॉसने आपल्या सहकाऱ्यांसाठी तब्बल 71  हजार रुपयांचं जेवण ऑर्डर केल्याचं समोर आलं होतं. सहकाऱ्यांसाठी केलेल्या या ऑर्डरची चर्चा झाली होती. पुण्यातील एक कंपनीतील अधिकाऱ्याने आपल्या सहकाऱ्यांसाठी तब्बल 71,000 रुपयांचे जेवण मागवलं होतं. यामध्ये बर्गर आणि फ्राईजचा समावेश होता. त्यांच्या या ऑर्डरची  सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली होती. पुण्यातील हे बॉस सगळ्यात जास्त किमतीची ऑर्डर देणारा स्विगीचा दुसरा ग्राहक ठरला होता. 

live reels News Reels

बिर्याणी सर्वाधिक लोकप्रिय

झोमॅटो आणि स्विगी या दोन्ही फुड डिलीव्हरी अॅपवर बिर्याणी सर्वाधिक लोकप्रिय पदार्थ ठरला आहे. दोन्ही अॅपचे अहवाल पाहता अनेक लोकांचा आवडीचा पदार्थ बिर्यानी असल्याचं समोर आलं आहे. त्यानंतर दोन्ही अॅपवर पिझ्झा लोकप्रिय ठरला आहे. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here