मुंबई: सर्वत्र मोठ्या जल्लोषात नव्या वर्षाचे स्वागत केले गेले. यादरम्यान आपले भारतीय क्रिकेटपटू देखील आपल्या परिवारासोबत नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी वेगवगेळ्या ठिकाणी गेले आहेत. त्यांच्या सोशल मीडियावर अकाऊंटवर ते नववर्षाचे फोटो पोस्ट करत आपल्या चाहत्यांना शुभेच्छाही देत आहेत. भारताचा नियमित कर्णधार रोहित शर्मा सध्या परिवारासोबत मालदीव येथे आहे. माजी क्रिकेटपटू आणि कर्णधार धोनी दुबईमध्ये सेलिब्रेशन करत आहेत तर कोहली देखील दुबईत आहे. याचदरम्यान भारताचा सूर्यकुमार यादव याने आपल्या सोशल मीडियावर आजच्या दिवसाचा एक खास फोटो पोस्ट केला आहे.

टी-२० मधील अव्वल दर्जाचा क्रिकेटर सूर्यकुमार यादव आणि त्याची पत्नी एका खास ठिकाणी जाऊन पोहोतले आहेत. हे दोघेही नववर्षाच्या पहिल्या दिवशी रविवारी सिद्धिविनायक मंदिरात जाऊन नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी गणपती बाप्पाचे आशीर्वाद घेतले. ३२ वर्षीय सूर्यकुमारने इंस्टाग्रामवर कॅप्शनसह एक फोटो पोस्ट केला आहे, “सिद्धिविनायक मंदिरात आशीर्वाद घेताना.” दुसरीकडे, कर्णधार रोहित शर्मा पत्नी रितिकासोबत मालदीवमध्ये सुट्टी घालवत आहे तर विराट कोहली अनुष्का शर्मासोबत दुबईत आहे.

वाचा: ऋषभ पंत अजूनही आयसीयूमध्ये, कर्णधार रोहितची डॉक्टरांसोबत चर्चा; जाणून घ्या

Suryakumar Yadav Visit Siddhivinyak Temple

Suryakumar Yadav at Siddhivinayak Temple

हेही वाचा: ऋषभ पंत ते सूर्यकुमारपर्यंत कोण हिट ठरले? पाहा २०२२ चे रिपोर्ट कार्ड

सूर्याला टीम इंडियाच्या टी-२० संघाचे उपकर्णधार बनवण्यात आले आहे. २०२२ हे वर्ष त्याच्यासाठी खूप चांगले होते. 360 डिग्री फलंदाज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सूर्याने ऑस्ट्रेलियासह सर्व मोठ्या संघांविरुद्ध चमकदार कामगिरी केली. त्याने टीम इंडियासाठी प्रत्येक स्थानावर आपली कामगिरी चोख बजावली आणि लवकरच त्याला विराट कोहलीचा रिप्लेसमेंट म्हणून त्याच्याकडे पाहू लागले होते.


वाचा: टीम इंडियात चाललंय काय? गौतम गंभीरची या खेळाडूला संघात घेण्याची मागणी, सिलेक्टर्सना सुनावले

श्रीलंकेविरुद्धच्या आगामी टी-२० मालिकेत सूर्या खेळताना दिसणार आहे. तो गेल्या वर्षी भारतासाठी टी-२० मध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरी करणारा खेळाडू ठरला आणि ICC टी-२० क्रिकेटर ऑफ द इयरसाठी नामांकन मिळालेला तो एकमेव भारतीय खेळाडू ठरला. २०२२ हे वर्ष सूर्यासाठी खूप चांगले होते. त्याने आपल्या 360-डिग्री शैलीच्या फलंदाजीने वर्षभरात हजाराहून अधिक धावा केल्या.


हेही वाचा: ऋषभ पंत ते सूर्यकुमारपर्यंत कोण हिट ठरले? पाहा २०२२ चे रिपोर्ट कार्ड

१८७.४३ च्या स्ट्राइक रेटने आणि ४६.५६ च्या सरासरीने ११६४ धावा करून तो वर्षभरात सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला. त्याने २०२२ मध्ये ६८ षटकार मारले, जे या वर्षातील कोणत्याही खेळाडूच्या तुलनेत सर्वाधिक षटकार आहेत. त्याने वर्षभरात दोन शतके आणि नऊ अर्धशतके झळकावली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here