मुंबई: ‘मी अजिबात निराशावादी नाही. स्वत: नाही आणि कोणाला होऊ देणार नाही,’ असं ठाम प्रतिपादन मुख्यमंत्री यांनी शिवसेनेचं मुखपत्र दैनिक ”ला दिलेल्या मुलाखतीत केलं आहे. महाविकास आघाडी सरकारबद्दलही त्यांनी आपली रोखठोक मतं मांडली आहेत.

शिवसेनेचे खासदार व सामनाचे कार्यकारी संपादक यांनी घेतलेली ही मॅरेथॉन मुलाखत येत्या २५ व २६ जुलै रोजी प्रसिद्ध होणार आहे. या मुलाखतीचा तिसरा प्रोमो राऊत यांनी आज ट्विट केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ‘अनलॉक’ मुलाखत असं याचं वर्णन राऊत यांनी केलंय.

वाचा:

शिवसेनेचे पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांनी ‘सामना’ला यापूर्वी अनेक मुलाखती दिल्या आहेत. मात्र, मुख्यमंत्री झाल्यानंतरची त्यांची ही पहिलीच मुलाखत आहे. भाजपशी दुरावा आल्यानंतर शिवसेनेनं अनपेक्षितपणे काँग्रेस-राष्ट्रवादीशी आघाडी केली आणि नव्या सरकारचं नेतृत्व कुठल्याही प्रकारचा प्रशासकीय अनुभव नसलेल्या उद्धव यांच्याकडं आलं. मुख्यमंत्रिपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर काही दिवसांतच करोनाच्या रूपानं संकट उभं राहिलं. त्यामुळं साहजिक उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीत सध्याच्या परिस्थितीच्या अनुषंगानं अनेक प्रश्न आहेत. मुलाखतीच्या संदर्भात राऊत यांनी केलेल्या तिसऱ्या व्हिडिओ ट्विटमधून तेच समोर आलं आहे.

संयम हवा की यम?

मुख्यमंत्र्यांच्या संयमी स्वभावाचं रहस्य या मुलाखतीतून उलगडणार आहे. उद्धव ठाकरे यांनी करोनाचं संकट खूप संयमानं हाताळल्याचं बोललं जातं. त्या संदर्भातील एका प्रश्नाला उत्तर देताना, ‘संयम पाहिजे की यम पाहिजे’, असा प्रतिप्रश्न करून त्यांनी उत्सुकता वाढवली आहे. उद्योगधंदे, गुंतवणूक याच बरोबर राष्ट्रभक्तीच्या मुद्द्यावरही त्यांनी आपली मतं मांडली आहेत.

वाचा:

एक गोष्ट स्वीकारली पाहिजे!

शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेसची महाविकास आघाडी काय म्हणतेय, असा प्रश्नही त्यांना विचारण्यात आलाय. त्यावर एक गोष्ट स्वीकारली पाहिजे असं त्यांनी म्हटलं आहे. ती गोष्ट कोणती, याचं उत्तर मुलाखतीतून मिळणार आहे. त्यामुळं मुलाखतीची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here