Chandrapur News Update : भाजपच्या “मिशन 144” ची ( Bjp Mission 144 ) सुरुवात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा चंद्रपुरातून करणार आहेत. यासाठी उद्या म्हणजे 2 जानेवारीला जे. पी नड्डा चंद्रपूर दौऱ्यावर येणार आहेत. चार्टर्ड विमानाने सकाळी 11 वाजता चंद्रपूरच्या मोरवा विमानतळावर नड्डा दाखल होतील. त्यानंतर ते चंद्रपूरचं आराध्य दैवत असलेल्या देवी महाकालीचे दर्शन घेणार आहेत. त्यानंतर सिव्हिल लाईनच्या न्यू इंग्लिश ग्राउंडवर नड्डा यांची जाहीर सभा होणार आहे. सभेनंतर नड्डा भाजपच्या ‘लोकसभा टीमशी’ एका बैठकीत संवाद साधणार आणि त्यानंतर औरंगाबादसाठी रवाना होतील. 

चंद्रपूरच्या दौऱ्यात जे. पी. नड्डांसोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर उपस्थित असतील. मागील लोकसभा निवडणुकीत ज्या ठिकाणी भाजपचा पराभव झाला त्या सर्व ठिकाणी भाजपने लक्ष केंद्रित केले असून त्याचाच एक भाग म्हणून राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या दौऱ्याकडे बघितले जात आहे. याआधी केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीपसिंह पुरी यांनी चंद्रपूर लोकसभा क्षेत्राचा दौरा करून केंद्र सरकारच्या विविध योजनांची अंमलबजावणी आणि भाजपच्या पक्षसंघटनाविषयक विविध मुद्द्यांची हाताळणी केली होती. चंद्रपूर भाजपच्या वतीने नड्डा यांच्या दौऱ्यासाठी जय्यत तयारी केली जात आहे.

Bjp Mission 144 : काय आहे भाजपचे मिशन 144? 

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. 2024 ची लोकसभा निवडणूक आता एका वर्षावर आलीय. सलग तिसऱ्या विजयासाठी भाजपने नियोजनबद्ध तयारी सुरू केली आहे.  भाजपने 2024 च्या लोकसभेसाठी मिशन 144 सुरु केलं आहे. देशातील 144 लोकसभा मतदारसंघांवर भाजपनं लक्ष केंद्रीत केलं आहे. यापैकी बहुतांश मतदारसंघात भाजपला विजय मिळालेला नव्हता. मिशन 144 च्या पहिल्या टप्प्यात केंद्रीय मंत्र्यांचे दौरे लोकसभा मतदारसंघात पार पडले आहेत. आता दुसऱ्या टप्प्यात भाजपचे प्रमुख नेते या 144 मतदारसंघात दौरे करणार आहेत. त्याचाच एक भाग म्हणून जे. पी. नड्डा आता चंद्रपूरच्या चौऱ्यावर येत आहेत. 

Bjp Mission 144 : विरोधकांच्या बाल्लेकिल्ल्यात धडाडणार तोफा

काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्या उत्तर प्रदेशमधील रायबरेली, सपाचे दिवंगत नेते मुलायम सिंह यादव यांचा मनिपुरी, महाराष्ट्रात सुप्रिया सुळे यांचा बारामती, पश्चिम बंगालमध्ये टीएमसीच्या मीमी चक्रवर्ती यांच्या जादवपूर, तेलंगाणामध्ये टीआरएसच्या श्रीनिवास रेड्डी यांच्या महाबुबनगर, मध्यप्रदेशमध्ये काँग्रेसच्या नकुल नाथ यांच्या छिंदवाडा मतदारसंघामध्ये भाजप ताकद लावणार आहे. या 144 लोकसभा मतदारसंघांपैकी 10 ते 12 मतदारसंघात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मोठ्या सभांचं आयोजन करण्यात येणार आहे.  

live reels News Reels

महत्वाच्या बातम्या

खळबळजनक! भाजपच्या माजी आमदाराच्या बंगल्याबाहेर आढळला महिलेचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह  

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here