Solapur Barshi Fire : सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील पांगरीमध्ये (Solapur Barshi Pangri Fire News) फटाका फॅक्टरीत भीषण स्फोट झाला आहे. यात अनेक कामगार जखमी झाल्याची माहिती आहे. या दुर्घटनेत दोन कामगारांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.  बार्शी तालुक्यातील पांगरी गावाजवळ ही घटना घडली आहे. फॅक्टरीमध्ये फटाके बनवण्याचे काम सुरू असताना भीषण स्फोट झाला.स्थानिकांच्या माहितीनुसार या घटनेमध्ये दोन कर्मचाऱ्यांचा मृत्यू झालाय. मात्र प्रशासनाने याला अद्याप कोणताही दुजोरा दिलेला नाही.

फटाका फॅक्टरीमध्ये जवळपास 40 कर्मचारी काम करत होते अशी प्राथमिक माहिती आहे. स्थानिकांच्या माहितीनुसार 6 ते 7 कर्मचारी जखमी झाल्याची आणि दोन कामगारांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.  अग्निशमन दल, पोलीस आणि प्रशासन घटनास्थळी दाखल झाले आहे. ही घटना पांगरी शिराळा रस्त्यावर असलेल्या एका फटाक्याच्या कारखान्यात घडली. घटनेनंतर मोठा आवाज परिसरात झाला. तसेच धुराचे आणि आगीचे लोट परिसरात दिसून येत होते. 

ही बातमी देखील वाचा

Solapur Barshi Fire : सोलापूर जिल्ह्यातील बार्शीमध्ये फटाका फॅक्टरीत भीषण स्फोट, अनेक कामगार जखमी

live reels News Reels

 

 

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here