Maharashtra Nashik igatpuri Fire : नाशिकच्या इगतपुरी तालुक्यातील मुंढेगाव परिसरात झालेल्या भीषण आगीत जखमी झालेल्या दोघा महिलांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या दोन्ही मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून पाच लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे. 

इगतपुरी तालुक्यातील मुंढेगाव परिसरात असलेल्या जिंदाल कंपनीत आग सकाळी स्फोट होऊन भीषण आग लागली. आगीची दाहकता एवढी एवढी होती की, परिसरातील गावावरून हे आगीचे लोळ दिसत होते. या घटनेत सुरवातीला 14 जखमी कामगारांना नाशिकच्या विविध रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान नाशिकच्या ट्रामा सेंटर चार जखमींना दाखल करण्यात आले होते. यातील दोघा महिलांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. महिमा आणि अंजली अशी दोघा मृत महिला कर्मचाऱ्यांची नावे आहेत.

दरम्यान घटनेची माहीती मिळाल्यानंतर औरंगाबाद येथे कृषी महोत्सवाच्या कार्यक्रमात असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे तात्काळ इगतपुरीला रवाना झाले असून ते नाशिकमधील जखमी रुग्णांची  विचारपूस करत आहेत. दरम्यान मृत महिलांच्या वारसांना पाच लाखांची मदत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केली आहे. तर जखमींवर योग्य उपचार होतील, त्याचबरोबर जखमींची सर्व खर्च सरकार करेल असे आश्वासन यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिले आहे. त्याचबरोबर संपूर्ण प्रकरणाची चौकशी करणार असल्याचे ते म्हणाले.

इगतपुरी तालुक्यातील मुंढेगाव एमआयडीसीतील जिंदाल कंपनीत रविवारी सकाळी भीषण आग लागल्याची घटना घडली. या कंपनीतील बॉयलरचा स्फोट झाल्याने कंपनीला आग लागल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे. जवळपास गेली तीन तासांपासून या ठिकाणी स्फोट होत असून आतापर्यंत येथून 14 जणांना बाहेर काढण्यात यश आले आहे. मात्र यामध्ये दोघा महिलेचा महिलांचा महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली आहे तर चार जणांचे प्रकृती गंभीर असून इतर नऊ जणांवर नाशिकच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत, अशी माहिती नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महा निरीक्षक बीजी शेखर पाटील यांनी दिली आहे. 

live reels News Reels

मंत्री, अधिकाऱ्यांकडून जखमींची विचारपूस

सद्यस्थितीत नाशिकच्या विविध रुग्णालयात जखमी रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या जखमींची विचारपूस करत असून यासोबत पालकमंत्री दादा भुसे, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी डी.गंगाथरण हे उपस्थित आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी भेट घेत पाहणी करून परिस्थितीची माहिती घेतली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here