तरुणांनी केलेला संतापजनक प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला. महिलेनं तक्रार केल्यानंतर सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. त्यात तीन तरुण रुममध्ये डोकावताना दिसले. यानंतर महिलेनं या प्रकरणी भवरकुआ पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.
काही दिवसांपूर्वी असाच प्रकार उत्तर प्रदेशच्या नोएडामधील हॉटेलात झाला होता. हॉटेलमधील रुममध्ये हिडन कॅमेरा बसवण्यात आला होता. पोलिसांनी या प्रकरणात दोघांना अटक केली. ते दोघे रुममध्ये थांबलेल्यांना व्हिडीओ दाखवून ब्लॅकमेल करायचे. आरोपींनी आधी रुम बुक करून त्यात छुपा कॅमेरा बसवला. हा कॅमेरा रुमची सफाई करणाऱ्या कर्मचाऱ्यालादेखील दिसला नाही.
हॉटेल रुममध्ये असताना काय काळजी घ्याल?
कोणत्याही रुममध्ये कॅमेरे लपवायचे असल्यास रुम डेकॉरचा आधार घेतला जातो. रुममधील स्पीकर्स, अलार्म क्लॉक किंवा सजावटीसाठी वापरल्या जाणाऱ्या वस्तूंमध्ये कॅमेरे लावले जातात. त्यामुळे अशा वस्तू तपासून पाहायला हव्यात. त्यांचं बारकाईनं निरीक्षण करायला हवं. होम डेकॉरसोबतच टीव्ही आणि सेट टॉप बॉक्सदेखील चेक करायला हवेत.