Pune Chandrakant patil :  पुण्याचे (pune) पालकमंत्री चंद्रकांत पाटील (chandrakant patil) यांनी विजयस्तंभाला घरुनच अभिवादन केलं.  कोरेगाव भीमा या ठिकाणी येऊन विजय स्तंभास अभिवादन करण्याची इच्छा होती. मात्र काहींनी पुन्हा शाई फेक करण्याची धमकी दिली आहे.  मी या धमक्यांना घाबरत नाही. अशा घटनेतून दंगल घडवून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करण्याची काहींची सुप्त इच्छा आहे. त्याचा त्रास विजय स्तंभास अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या आंबेडकर अनुयायांना होऊ नये, यासाठी आपण घरुनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि विजय स्तंभास अभिवादन करत असल्याच चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं आहे. पत्रक काढत त्यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. 

पत्रकात त्यांनी लिहिलं आहे की, शौर्य दिनाच्या निमित्ताने 1 जानेवारीला युध्दात प्राणाची आहुती दिलेल्या सैनिकांच्या शौर्याचे प्रतीक म्हणून त्यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ भीमा कोरेगावला उभारलेल्या विजयस्तंभास अत्यंत विनम्र अभिवादन करतो. सर्वांनी शांततेने शौर्याचे प्रतीक असलेल्या विजयस्तंभास मानवंदना द्यावी दर्शन घ्यावे. कोणतीही जातीय तेढ निर्माण होऊ नये, असं आवाहन त्यांनी केलं आहे.

‘100 कोटी निधीची अंमलबजावणी करणार’
शौर्य दिनाच्या निमीत्ताने मानवंदना देण्यास आणि अभिवादन करण्यास भीमा कोरेगाव येथे विजयस्तंभास मानवंदना देता यावी.दर्शन घेता यावे यासाठी सरकारने सर्व सुविधा उभारल्या आहेत. त्या क्षेत्राच्या विकासासाठी 100कोटी रुपयांचा निधीही देण्याचे शासनाने निश्चित केले आहे. 100 कोटी निधीची अंमलबजावणी करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. 

‘डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती घराघरात साजरी व्हावी’
बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1 जानेवारी 1927 रोजी आपल्या अनुयायांसह, कोरेगाव भीमा येथे शौर्याचे प्रतीक असलेल्या विजयस्तंभास मानवंदना दिली होती. तेव्हापासून हजारो, लाखो अनुयायी दरवर्षी भिमाकोरेगांवला विजयस्तंभास मानवंदना देण्यासाठी येत असतात. बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्याबद्दल माझ्या मनात प्रचंड श्रद्धा आहे त्याचं जाहीर प्रदर्शन करणं हा माझा स्वभाव नाही. सन 1882 साली स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जन्मशताब्दी निमित्त अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने रत्नागिरीचे पतीतपावन मंदिर ते दादरच्या चैत्यभूमीपर्यंत एक महिनाभर चाललेल्या समता यात्रेचे नेतृत्व मी केलं आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती घराघरात साजरी व्हावी आणि नव्या पीढीपर्यंत त्यांचे विचार पोहोचावे म्हणून प्रत्यक्ष प्रयत्न केले, असंही त्यांनी पत्रकात लिहिलं आहे. 

live reels News Reels

‘पुन्हा शाई फेकू म्हणून धमकी आली’
मी दोन वेळा दिलगिरी व्यक्त करुनही माझ्या विधानाचा विपर्यास करून माझ्यावर शाई फेकण्याचा भ्याड हल्ला झाला.डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान झाला म्हणणाऱ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची घटना पायदळी तुडवली. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या कुठल्याही आंदोलनात अपवादानेही हिंसा नव्हती. आता मी भीमा कोरेगाव ला विजयस्तंभाच्या दर्शनास आणि अभिवादनास आलो तर पुन्हा शाई फेकू म्हणून धमकी आली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मार्गाने चालण्यासाठी मी शाईच काय छातीवर गोळ्याही झेलण्यास तयार आहे. मात्र लाखो अनुयायी दरवर्षी कोरेगाव भिमाला विजयस्तंभास मानवंदना देण्यासाठी येणाऱ्यांमध्ये अशा एखाद्या घटनेमुळे गालबोट लागावे, जातीय दंगे व्हावे, अशी काही जणांची सुप्त इच्छा आहे. मोठ्या प्रमाणात माझ्या माता, भगिनी, वयस्कर मंडळी, लेकरं तिथे श्रध्देने आले असतील किंवा येत असतील तर त्यांची श्रद्धा आणि सुरक्षितता ही माझ्या दृष्टीने खूप महत्त्वाची आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here