Pune Crime News : 100 रूपयांसाठी (crime) चौघांनी एका विद्यार्थ्याचा (pune) डावा हात मनगटापासून कापून टाकल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पुण्यातील पाषाण परिसरात ही घटना घडली आहे. नववर्षाचे स्वागत करण्यात सर्वजण मग्न असताना रात्री एकच्या सुमारास ही घटना घडली आहे. मात्र पोलिसांच्या प्रसंगावधानामुळे या तरुणाचा जीव वाचला आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे आणि अल्पवयीन असलेल्या दोघांना ताब्यात घेतलं आहे. 

पंकज तांबोळी असं हल्ला करण्यात आलेल्या व्यक्तीचं नाव आहे. त्याचा मित्र आशुतोष अर्जुन माने याने यासंदर्भात पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीनुसार प्रणव काशिनाथ वाघमारे, गौरव गौतम मानवतकर या आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांच्यासोबतच असलेल्या दोन अल्पवयीन मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आशुतोष माने हा अभिजित सानमुटे, साजिद शेख, स्वप्निल पाटील, मिहीर देशपांडे यांच्यासोबत राहत होता. मागील दोन महिन्यांपासून चौघे रुममेट होते. थर्टी फर्स्टमुळे पुण्यातील काही मेस बंद होत्या. त्यामुळे आशुतोष माने, साजीद शेख, पंकज तांबोळी हे साई चौकात आले होते. यावेळी पंकजही त्याचा मित्र मयूर फुंदेसोबत आला होता. सर्वांनी हॉटेलमध्ये जेवण केलं आणि हॉटेल बाहेर उभे होते. त्यावेळी दुचाकीवरुन दोन मुलं भरधाव आली आणि त्यांनी पंकज आणि मयूरकडे 100 रुपये मागितले. 

शिवीगाळ केली अन् थेट मनगट कापलं

या मुलांना पंकज आणि मयूरने पैसे देण्यास नकार दिला. त्यावेळी मुलांनी यांच्यावर जबरदस्ती केली. शिवीगाळ करण्याला सुरुवात केली. यानंतर दुचाकीस्वार असलेल्या दोघांचा राग अनावर झाला आणि त्यांनी बाकी मित्रांना बोलावून घेतलं. पंकजने पैसे देण्यास नकार दिल्यामुळे त्यांच्या हातावर धारदार शस्त्रांनी वार केले. यात पंकजचा हात मनगटापासून खाली पडला. मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला. परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं. ही माहिती पोलीसांना कळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांच्या प्रसंगावधानामुळे पंकजचा जीव वाचला. 

live reels News Reels

ते आले आणि त्यांनी वाचवलं…

हा सगळा प्रकार कळल्यावर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. रक्तबंबाळ असलेल्या पंकजला दवाखान्यात दाखल केलं. त्याच्यावर तातडीने उपचार झाल्यामुळे जीव वाचला. माने यांनी हल्ला करणाऱ्या मुलांचं वर्णन सांगितलं त्यानुसार पोलिसांनी शोध घेण्यास सुरुवात केली. त्यांनी रविवारी (1जानेवारी) दुपारी दोघांना बेड्या ठोकल्या.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here