Happy New Year at Jalgaon:  31 डिसेंबर म्हटलं की बहुतांश ठिकाणी दारू आणि मटणाच्या पार्ट्याचे आयोजन (New Year Celebration ) करण्यात येत असल्याचं चित्र आपल्याला नेहमीच पाहायला मिळतं. मात्र गोमूत्र प्राशनाच्या अनोख्या पार्टीचे आयोजन जळगावमधील रतनलाल बाफना गोसेवा अनुसंधान केंद्रामध्ये (Jalgaon Ratanlal Bafna) करण्यात आले होते.

31  डिसेंबर निमित्ताने अनेक जण दारू मटण खाऊन पार्टी करत असतात. मात्र यामध्ये पैशांसह दारूच्या दुष्परिणाम होण्याच्या मोठा धोका असतो. अनेकजण या निमित्ताने सुरुवात करून नंतर मद्याच्या आहारी गेल्याचंही पाहायला मिळतं.  दारू पार्टीचे दुष्परिणाम टाळण्यासाठी जळगाव मधील बाफना गोसेवा अनुसंधान केंद्रातील गोभक्त दर वर्षी गोमूत्र पिऊन अनोख्या पद्धतीने नववर्षाचे स्वागत करत असल्याचे पाहायला मिळत असतं. यंदाही मोठ्या उत्साहाने या गोभक्तांनी या गोमूत्र पार्टीचा आनंद घेतला असल्याचं पाहायला मिळाले आहे.

गोमूत्र नियमित प्यायल्याने आरोग्य उत्तम राहते आणि आयुष्य वाढते

गोमूत्र नियमित प्यायल्याने आरोग्य उत्तम राहते आणि आयुष्य वाढते अशी या गोभक्तांची श्रद्धा आहे. शिवाय गोमूत्र पिण्याने दारू पिण्याची इच्छा होत नसल्याने दारू मटणापासून दूर राहण्याचा हा उत्तम पर्याय असल्याचं देखील आयोजकांचं मत आहे.

सर्व गो भक्त आपल्या कुटुंबासह एकत्र येऊन हा उपक्रम राबवतात

मांस आणि दारू पिण्यापेक्षा गोमूत्र पिणे हे कधीही फायदेशीर आहे. या पार्टीच्या निमित्ताने आम्ही सर्व गो भक्त आपल्या कुटुंबासह एकत्र येऊन हा उपक्रम राबवत असतो. त्यामुळे कुटुंबासोबत असल्याने एक वेगळा आनंद ही आम्हाला मिळत असतो. नाहीतर दारू पिणारे कुटुंबाला सोडून  एकटेच दारू प्यायला जात असतात. रस्त्यावर लोळतात, त्यापेक्षा तर गोमूत्र पिणे हे कधीही चांगले असल्याचा आमचा अनुभव आहे, असं सहभागी झालेले नागरिक सांगतात. 

live reels News Reels

दारू पिण्यानं ही जेवढा आनंद मिळत नसेल त्यापेक्षाही जास्त आनंद या गोमूत्र पार्टीमधून

नवीन वर्षाच्या निमित्ताने अनेक जण प्राण्यांचा मारून त्यांचं भक्षण करतात. मात्र प्राण्यांचा जीव घेऊन आपला आनंद घेणे हे चुकीचे आहे. त्यामुळे आमचा या गोष्टीला विरोध असून हे टाळणयासाठी आम्ही गोमूत्र पार्टीचे आयोजन करत असतो. दारू पिण्यानं ही जेवढा आनंद मिळत नसेल त्यापेक्षाही जास्त आनंद आम्हाला या गोमूत्र पार्टीमधून मिळतो. गोमूत्र पिण्याने कोणतेही नुकसान नाही तर ते फायदेशीरच असल्याची प्रतिक्रिया  गोभक्तांनी दिली. 

ही बातमी देखील वाचा

Road Accident: एक डुलकी अन् जीवाशी खेळ! सर्वाधिक रस्ते अपघात ‘या’ वेळेतच होतात- काय आहेत कारणं 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here