Maharashtra Politics | फडणवीसांच्या कार्यक्रमाला दांडी मारणाऱ्या पंकजा मुंडेंना जे.पी. नड्डांच्या कार्यक्रमाला निमंत्रणच नाही. भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा औरंगाबादला येणार, पण पंकजा मुंडेंना कार्यक्रमाचे निमंत्रणच नाही. पंकजा मुंडे या मराठवाड्यातील प्रमुख आणि सामर्थ्यशाली भाजप नेत्यांपैकी एक आहेत. मात्र, त्यांनाच जे.पी. नड्डा यांच्या कार्यक्रमापासून दूर ठेवण्यात आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. यामुळे पंकजा मुंडे यांचे समर्थक नाराज होऊन त्याचे तीव्र पडसाद उमटण्याची शक्यता आहे.

 

J P Nadda in Maharashtra
जे.पी. नड्डा महाराष्ट्रात

हायलाइट्स:

  • जे.पी. नड्डा हे सोमवारी औरंगाबादमध्ये येणार आहेत
  • पंकजा मुंडे या मराठवाड्यातील प्रमुख भाजप नेत्यांपैकी एक आहेत
  • या कार्यक्रमात पंकजा मुंडे यांची उपस्थिती असणे अपेक्षित होते
औरंगाबाद: आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या तयारीसाठी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा हे सोमवारी महाराष्ट्रात येणार आहे. जे.पी. नड्डा यांच्या चंद्रपूर आणि औरंगाबाद दौऱ्याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. मात्र, जे.पी. नड्डा यांच्या या कार्यक्रमपासून भाजपच्या राष्ट्रीय नेत्या पंकजा मुंडे यांना दूर ठेवण्यात आल्याची चर्चा आहे. नुकत्याच बीड येथे देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमाला पंकजा मुंडे यांनी दांडी मारली होती. याची जोरदार चर्चा सुरु असतानाच आता पंकजा यांना भाजप पक्षश्रेष्ठींच्या कार्यक्रमापासून दूर ठेवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. जे.पी. नड्डा हे सोमवारी औरंगाबादमध्ये येणार आहेत. पंकजा मुंडे या मराठवाड्यातील प्रमुख भाजप नेत्यांपैकी एक आहेत. त्यामुळे या कार्यक्रमात पंकजा मुंडे यांची उपस्थिती असणे अपेक्षित होते. परंतु, पंकजा मुंडे यांना या कार्यक्रमाचे निमंत्रणच मिळालेले नाही. त्यामुळे पंकजा मुंडे यांचे समर्थक नाराज होण्याची शक्यता आहे.

या पार्श्वभूमीवर माधव बन ओबीसी भटके विमुक्त संघर्ष कृती समितीचे अध्यक्ष प्रा.डॉ. खुशाल मुंडे यांनी भाजप नेत्यांवर टीकास्त्र डागले आहे. पंकजा मुंडे यांना महाराष्ट्राच्या राजकारणापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे. भाजपने ध्यानात ठेवायला पाहिजे की, या महाराष्ट्रामध्ये आणि एकूणच देशात बहुजन जनतेची एकजूट भाजपच्या पाठीशी उभं करण्यासाठी लोकनेते गोपीनाथ मुंडे यांनी दाखवून दिलेली आहे. मुंडे साहेबांप्रमाणे पंकजा मुंडे या ही भाजपात काम करत आहेत. परंतु भाजपचे काही नेते त्यांना बाजूला करत आहेत.२०२४ मध्ये भाजपला याची किंमत मोजावीच लागणार, हे लक्षात ठेवा, असे खुशाल मुंडे यांनी म्हटले आहे. त्यामुळे आता यावर भाजपच्या गोटातून काय प्रतिक्रिया येणार, ते पाहावे लागेल.
फडणवीस-बावनकुळे बीडला, पण मुंडे भगिनींची कार्यक्रमाकडे पाठ, नाराजीच्या चर्चांना पुन्हा उधाण

पंकजा मुंडेंनी कुत्र्याचा वाढदिवस साजरा केला, पण फडणवीस-बावनकुळेंच्या कार्यक्रमाला गेल्या नाहीत

कजा मुंडे यांनी शनिवारी बीडमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या कार्यक्रमाला दांडी मारली होती. या सगळ्याची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली असतानाच पंकजा मुंडे यांनी काहीवेळातच त्यांच्या इन्स्टाग्राम पेजवरुन आपल्या लाडक्या कुत्र्याच्या वाढदिवसाची पोस्ट शेअर केली. यामध्ये त्यांनी कुत्र्याचा वाढदिवस साजरा करतानाचे काही फोटोही शेअर केले. या सगळ्यामधून पंकजा मुंडे यांना काही संदेश द्यायचा आहे का, अशी शंका अनेकांनी उपस्थित केली होती. फडणवीस-बावनकुळेंच्या कार्यक्रमापेक्षा पंकजा यांना आपल्या कुत्र्याचा वाढदिवस अधिक महत्त्वाचा वाटतो का, अशी प्रश्नार्थक कुजबूज बीडमधील राजकीय वर्तुळात सुरु आहे.
चित्रा वाघ यांना भाजपच्या महिला मोर्चाचे अध्यक्षपद, चर्चा मात्र पंकजांच्या हुकलेल्या संधीची

भाजप अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा आज चंद्रपुरात ;फडणवीस,बावनकुळे यांची उपस्थिती

भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांची आज सकाळी १० वाजता चंद्रपूर येथील न्यू इंग्लिश हायस्कुल शाळेच्या शासकीय विश्रामगृहासमोरील पटांगणावर जाहीर सभा होणार आहे . सन २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या मतदारसंघावर भाजपने लक्ष्य केंद्रीत केले आहे . यासाठी भाजपने मिशन १४४ आणि लोकसभा प्रवास अशा कार्यक्रमांची आखणी केली आहे . या – कार्यक्रमाची सुरुवात चंद्रपूर – वणी आर्णी लोकसभा मतदार संघातून नड्डा यांच्या हस्ते होणार आहे . या सभेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे , राज्याचे वन व सांस्कृतिकमंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार , मागासवर्गीय आयोगाचे राष्ट्रीय अध्यक्ष हंसराज अहीर यांच्यासह अन्य मान्यवर नेते मंडळी उपस्थित राहणार आहेत.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here