अजित पवारांवर टीका करताना संभाजीराजे पुढे म्हणाले की, ‘संभाजी महाराज हे धर्मरक्षक असल्याचे अनेक पुरावे आहेत. अजित पवारांनी कोणत्याही ऐतिहासिक गोष्टीवर बोलताना अभ्यास पूर्ण केल्याशिवाय प्रतिक्रिया देऊ नये. ते आता अर्धसत्य बोलले आहेत. संभाजी महाराज स्वराज्यरक्षक होते, हे अजित पवारांचं म्हणणं बरोबर आहे. मात्र ते धर्मवीर नव्हते, हे योग्य नाही.’
दरम्यान, संभाजीराजेंनी घेतेलल्या या भूमिकेवर आता राष्ट्रवादीकडून काय प्रतिक्रिया दिली जाते, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
अजित पवार नेमकं काय म्हणाले होते?
विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान सभागृहात बोलताना अजित पवार यांनी म्हटलं होतं की, ‘आपण छत्रपती संभाजी महाराज यांचा उल्लेख स्वराज्यरक्षक असा करतो. मात्र, त्यांना काही लोक धर्मवीर म्हणत आहेत. छत्रपती संभाजी महाराजांनी कधीही धर्मावरुन राज्य केलं नाही,’ असं वक्तव्य अजित पवारांनी केले होते. या विधानावर आक्षेप घेत अजित पवारांनी धर्मवीर संभाजी महाराज यांचा अपमान केला असून त्यांना विरोधी पक्षनेतेपदावर राहण्याचा नैतिक अधिकार नाही, असा हल्लाबोल भाजपकडून केला जात आहे.