जळगाव : जळगाव शहरातील तांबापुरा भिलाटी परिसरातील १९ वर्षीय तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी सकाळी समोर आली आहे. मनोहर कैलास गायकवाड (वय १९) असे मृत तरुणाचे नाव आहे. आत्महत्येचे नेमक कारण अद्याप अस्पष्ट आहे.

मनोहर कैलास गायकवाड तांबापुरा परिसरात आई-वडील आणि लहान भावासोबत वास्तव्याला होता. एमआयडीसीतील एका कंपनीत रोजंदारी वर काम करून तो कुटुंबाला हातभार लावत होता. ३१ डिसेंबरला रात्री ११ वाजता मनोहर जेवण करून घराच्या मागच्या खोलीत झोपायला गेला. यादरम्यान मध्यरात्री त्याने दोरीने गळफास घेऊन जीवन संपविले. रविवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास आई राधाबाई मनोहरला उठविण्यासाठी आवाज देत होत्या. मनोहर कुठलाही प्रतिसाद देत नसल्याने त्या खोलीत गेल्या असता मनोहर गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला.

IND vs SL: उद्यापासून सुरु होणारे टी-२० सामने कुठे लाईव्ह पाहता येणार, वाचा सविस्तर माहिती

मनोहरचा मृतदेह पाहून राधाबाई यांनी हंबरडा फोडला. घटनेची माहिती मिळाल्यावर एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळ गाठून मनोहर याचा मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलविला. शवविच्छेदन करून मृतदेह कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आला. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मनोहर याने आत्महत्या का केली? या घटनेचे नेमके कारण स्पष्ट झालेले नसले तरी मनोहर याने प्रेम प्रकरणातून आत्महत्या केल्याची शक्यता त्याच्या निकटवर्तीय तरुणांनी व्यक्त केली आहे. पुढील तपास पोलीस नाईक नितीन पाटील, तुषार गिरासे हे करत आहेत.

जग आर्थिक संकटात सापडलंय, पण मोदीजी भारतीय अर्थव्यवस्थेला मजबूतपणे पुढे नेतायत: जे.पी. नड्डा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here