Aurangabad Crime News: नवीन वर्षाचे सर्वत्र आनंदाने स्वागत केले जात असतानाच औरंगाबाद (Aurangabad) मात्र अनोळखी मृतदेहांच्या (Unknown Dead Body) घटनांनी हादरलं आहे. कारण एकाच दिवसांत जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी चार मृतदेह आढळून आले आहेत. कन्नड तालुक्यात दोन, गंगापूर तालुक्यात एक आणि वाळूज महानगर परिसरात एक असे एकूण चार मृतदेह एकाच दिवशी आढळून आल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.  

पहिली घटना कन्नड शहरात समोर आली आहे. शहरातील न्यु हायस्कुल शाळेच्या पाठीमागे भाऊसाहेब कदम यांच्या ऊसाच्या शेतात कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला आहे. कदम यांच्या शेतात सद्या उसतोड सुरू असून, दुर्गंधी पसरल्याने पाहणी केली असता मृतदेह आढळून आला. त्यानंतर याची माहिती पोलिसांना देण्यात आली. तर माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. हा मृतदेह दहा ते बारा दिवसा अगोदर आणून टाकल्याचा पोलिसांनी अंदाज वर्तवला आहे. 

दुसरी घटना गंगापूर तालुक्यात समोर आली आहे. औरंगाबाद-अहमदनगर महामार्गावरील पेंढापूर फाट्याजवळील ढोरेगाव शिवारात एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला आहे. या परिसरातील एका ऊसाच्या शेतात पाणी भरण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याला हा मृतदेह दिसून आला. त्यामुळे या घटनेची माहिती गंगापूर पोलिसांना देण्यात आली. तर माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. तर पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार मृत व्यक्तीचे नाव सुनील प्रकाश जमदाडे आहे. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला असून, पुढील तपास सुरु आहे. 

live reels News Reels

तिसरा मृतदेह वाळूज महानगरात आढळला… 

तिसरी घटना औरंगाबाद वाळूज महानगरमध्ये समोर आली आहे.  वाळूज परिसरातील गरवारे कंपनीच्या गोडाऊन जवळ अंदाजे एका 32 वर्षाच्या व्यक्तीचा मृतदेह आढळून आलाय. या मृतदेहाची अजून ओळख पटलेली नाही. तर अनोळखी मृतदेह आढळून आल्याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत, पाहणी केली आहे. तर घटनास्थळी पंचनामा करण्यात आला आहे. तर संबधित मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरु आहे.

चौथा मृतदेह कन्नड तालुक्यात आढळून आल्याने खळबळ…

जिल्ह्यात आधीच तीन मृतदेह आढळून आले असतानाच आता आणखी एक मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. कन्नड तालुक्यातील करंजखेड येथे एका विहिरीमध्ये एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला आहे. प्राथमिक माहितीनुसार अनंता मसुरे असे मयत व्यक्तीचे नाव आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत, मृतदेह विहिरीतून बाहेर काढत शासकीय घाटी रुग्णालयात पाठवला आहे. पोलिसांकडून पंचनामा करण्यात आला पुढील तपास सुरु आहे. मात्र कन्नड तालुक्यात दिवसभरात दोन मृतदेह एकाच दिवसांत आढळून आल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here