Police Recruitment : पोलिस भरतीच्या मैदानी चाचणीला आजपासून सुरुवात झाली आहे.  5 जानेवारीपर्यंत चालणाऱ्या या मैदानी चाचणीला आज सुरुवात झाली. कडाक्याच्या थंडीत देखील चाचणीसाठी उमेदवारांनी गर्दी केली होती. राज्यातील धुळे, हिंगोली, परभणी,  यवतमाळ, भंडारा, नाशिक आणि अमरावती जिल्ह्यात ही भरती होत आहे. पोलिस विभागातील वेगवेगळ्या पदांसाठी 18 हजार जागा भरल्या जाणार आहेत. या 18 हजार जागांसाठी जवळपास 18 लाख अर्ज प्राप्त झाले आहेत.   

Police Recruitment : अमरावतीत 40 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर

अमरावती जिल्ह्यात आज सकाळी पोलिस भरतीला सुरुवात झाली. अमरावती ग्रामीणसाठी 156 शिपाई तर 41 चालक पदासाठी भरती प्रक्रिया पार पडत आहे. या भरती प्रक्रियेवर 40 सीसीटीव्ही कॅमेरे आणि प्रत्येक इव्हेंटवर व्हिडीओ कॅमेऱ्याची नजर आहे. 

Police Recruitment : नाशिकमध्ये 21 हजार 49 उमेदवार मैदानात

नाशिक जिल्ह्यासाठीच्या पोलिस भरतीसाठी 179 जागांसाठी तब्बल 21 हजार 49 उमेदवार मैदानात उतरले आहेत. आडगाव परिसरातील पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर ही चाचणी सुरु आहे. 

live reels News Reels

Police Recruitment :  हिंगोलीसाठी जागा वाढवण्याची मागणी

हिंगोली जिल्ह्यातही आज पोलिस भरतीची प्रक्रिया सुरु झाली. संत नामदेव कवायत मैदानात सुरू असलेल्या या भरतीला युवकांनी चांगला प्रतिसाद दिला. परंतु, जिल्ह्यासाठी जागा कमी असून या जागा वाढवण्यात याव्यात अशी मागणी जिल्ह्यातील तरुणांनी केली आहे.  
 

Police Recruitment :  धुळ्यात 42 जागांसाठी 3800 हून अधिक अर्ज

धुळे जिल्ह्यात देखील आज या भरती प्रक्रियेला सुरूवाद झाली. 7 ते 8 अंशाच्या तापमानात उमेदवारांची खरी परीक्षा होणार आहे. जिल्ह्यातील 42 जागांसाठी तब्बल 3800 हून अधिक अर्ज आले आहेत.

Police Recruitment : भंडाऱ्यात 117 पदांसाठी भरती 

भंडारा जिल्ह्यात 117 पदांसाठी पोलिस भरती प्रक्रिया सुरू आहे. आज पहाटेपासून उमेदवारांनी मैदानात प्रचंड गर्दी झाली होती. भंडारा पोलिस मुख्यालयात 9 दिवस भरती प्रक्रिया चालणार आहे.

Police Recruitment : यवतमाळमध्ये 302 जागांसाठी 26 हजार 385 अर्ज 

यवतमाळ जिल्ह्यातील 302 जागांसाठी पोलिस भरतीला सुरुवात झाली आहे. 302 जागांसाठी 26 हजार 385 अर्ज आले आहेत.  

Police Recruitment : रत्नागिरीत सात हजारांहून अधिक अर्ज

रत्नागिरीतील शिवाजी स्टेडियमवर पोलिस भरतीची चाचणी प्रक्रिया सुरू आहे. 131  जागांसाठी 7 हजारांहून अधिक उमेदवारांचे अर्ज आले आहेत.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here