Nagpur Water Supply : सक्करदरा जलकुंभच्या मुख्य जलवाहिनीला गोधनी येथील पेंच-4 जलशुद्धीकरण केंद्राच्या जलवाहिनीशी जोडण्याकरिता, नागपूर महानगरपालिकेने (Nagpur Municipal Corporation) गोधनी पेंच-4 जलशुद्धीकरण केंद्राचे 4 जानेवारीला 24 तासांचे शटडाऊन घेण्याचे ठरवले आहे. या कामादरम्यान गोधनी पेंच-4 जलशुद्धीकरण केंद्र 4 जानेवारीला पूर्णपणे बंद राहणार आहे. त्यामुळे आशीनगर झोन, लक्ष्मीनगर झोन, धरमपेठ झोन, हनुमाननगर झोन आणि नेहरुनगर झोन्समधील 8 जलकुंभांचा पाणी पुरवठा 4 जानेवारीला सकाळी 10 वाजल्यापासून 5 जानेवारीच्या सकाळी 10 वाजेपर्यंत पूर्णपणे बंद राहणार आहे. 

यात आशीनगर झोनमधील नारा जलकुंभ, नारी-जरीपटका जलकुंभ, धरमपेठ झोनमधील धंतोली जलकुंभ, लक्ष्मीनगर झोनमधील लक्ष्मीनगर जलकुंभ, हनुमाननगर झोनमधील नालंदानगर, श्रीनगर, ओंकारनगर 1 व 2. म्हाळगीनगर जलकुंभाचा समावेश आहे. या शटडाऊनमुळे टँकरद्वारेही पाणी पुरवठा होऊ शकणार नाही.

या वस्त्या राहणार बाधित

नारा जलकुंभ : निर्मल सोसायटी, आराधना कॉलनी, शंभूनगर, शिवगिरी ले-आउट, नुरी कॉलनी, तववकल सोसायटी, आर्यनगर, ओमनगर, नारागाव, वेलकम सोसायटी, देवीनगर, प्रीती सोसायटी.

live reels News Reels

नारी/ जरीपटका जलकुंभ : भीमचौक, हुडको कॉलनी, नागार्जुना कॉलनी, कस्तुरबानगर, कुकरेजानगर, मार्टिननगर, विश्वासनगर, खुशीनगर, एलआयजी कॉलनी, एमआयजी कॉलनी, सुगतनगर, कबीरनगर, कपिलनगर, कामगारनगर, रमाईनगर, दीक्षितनगर, सन्यालनगर, चैतन्यनगर, सहयोगनगर मानवनगर, शेंडेनगर, राजगृहनगर, लहानुजीनगर

लक्ष्मीनगर नवे जलकुंभ: सुरेंद्रनगर, देवनगर, सावरकरनगर, विवेकानंदनगर, विकासनगर, हिंदुस्तान कॉलनी, प्रगतीनगर, गजानननगर, सहकार्यनगर, समर्थनगर (पूर्व व पश्चिम), प्रशांतनगर, संपूर्ण अजनी भाग, उरुवेला कॉलनी, राहुलनगर, नवजीवन कॉलनी, छत्रपतीनगर पॉवर हाऊस जवळ, कानफाडेनगर, विश्रामनगर, संताजीनगर, नरसुंदकर ले-आउट, एलआयसी कॉलनी, रामकृष्णनगर व इतर. धंतोली जलकुंभ : धंतोली, काँग्रेसनगर, हम्पयार्ड रोड, तकिया स्लम.

ओंकारनगर 1 व 2 जलकुंभ : रामटेकेनगर, रहाटेनगर टोली, अभयनगर, गजानननगर, जोगीनगर, पार्वतीनगर, भीमनगर, जयभीम नगर, जयवंतनगर, शताब्दीनगर, कुंजीलाल पेठ, हावरापेठ, बालाजीनगर, चंद्रनगर, नालंदानगर, रामेश्वरी, बॅनर्जी ले-आउट

म्हाळगीनगर जलकुंभ : सन्मार्गनगर, अन्नपूर्णानगर, नवे नेहरू नगर स्लम, विघ्नहर्तानगर, संतोषीनगर, सरस्वतीनगर, शिवशक्तीनगर, जानकीनगर, न्यू अमर नगर, विज्ञाननगर, गुरुकुंजनगर, म्हाळगीनगर, गजानननगर, प्रेरणानगर, सूर्योदयनगर, महालक्ष्मीनगर, महात्मा गांधीनगर, अष्टविनायक कॉलनी, राधाकृष्णनगर, शिवाजीनगर, मां भगवतीनगर.

श्रीनगर जलकुंभ : श्रीनगर, सुंदरबन, 85 प्लॉट, सुयोगनगर, साकेतनगर, अरविंद सोसायटी, बोरकुटे ले-आउट, पीएमजी सोसायटी, विजयानंद सोसायटी, संताजी सोसायटी, डोबीनगर, म्हाडा कॉलनी.

ही बातमी देखील वाचा…

Nagpur Weather : पहाटे गारठा अन् दुपारी उकाडा; नागपूरचा पारा पुन्हा वाढतोय…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here