मुंबई: अयोध्येतील राम मंदिराबाबत केलेल्या वक्तव्याचा निषेध म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष यांना भारतीय जनता युवा मोर्चाकडून (भाजयुमो) ” लिहिलेली १० लाख पत्रे पाठवली जाणार आहेत. ‘भाजयुमो’च्या या पत्रहल्ल्याला जशास तसं उत्तर देणार आहे. (NCP Youth wing to give befitting Reply to BJYM)

अयोध्येत ५ ऑगस्ट रोजी राम मंदिराचा (Ayodhya Ram Mandir) भूमिपूजन सोहळा होणार आहे. केंद्र सरकारनं नुकतीच या सोहळ्याची तारीख निश्चित केली. देशावर करोनाचे संकट असताना हे भूमिपूजन होत असल्यानं शरद पवार यांनी केंद्र सरकारला चिमटा काढला होता. मंदिर बांधल्यानं करोना जाईल असं काही वाटत असल्याचं शरद पवार म्हणाले होते. त्यावरून बराच वाद झाला. भाजप नेत्यांनी पवारांवर टीकाही केली. त्यापुढं जाऊन भाजयुमोच्या कार्यकर्त्यांनी पवारांना ‘जय श्रीराम’ लिहिलेली १० लाख पत्र पाठवण्याचं ठरवलं आहे.

भाजपच्या या खेळीला उत्तर म्हणून राष्ट्रवादी युवक काँग्रेसनं माजी केंद्रीय मंत्री व विद्यमान उपराष्ट्रपती यांना ‘जय भवानी, जय शिवाजी’ असं लिहिलेली २० लाख पत्र पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी बुधवारी राज्यसभा सदस्यत्वाची शपथ घेतली होती. त्यावेळी त्यांनी ” अशी घोषणा केली होती. त्यास नायडू यांनी आक्षेप घेतला होता. त्याचा निषेध म्हणून ही पत्रे पाठवली जाणार आहेत. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष मेहबूब शेख यांनी ‘एबीपी माझा’ या वृत्तवाहिनीला माहिती दिली.

वाचा:

‘जय भवानी, जय शिवाजी’ या घोषणेला आक्षेप घेऊन नायडू यांनी महाराष्ट्रद्वेष दाखवून दिला आहे. भाजप नेत्यांच्या मनात शिवरायांबद्दल नेमक्या काय भावना आहे हेच यातून दिसून आलंय. याचा निषेध म्हणून आम्ही २० लाख पोस्टकार्ड नायडूंना पाठवणार आहोत,’ असं शेख यांनी सांगितलं.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here