Beed Farmer News: शेतातील वीज कनेक्शन खंडीत केल्याने त्रस्त झालेल्या एका शेतकऱ्याने (Farmer) सोशल मीडियावर लाईव्ह व्हिडीओ (Social Media Live Video) करत विष (Poison) प्राशन केल्याची घटना बीडच्या गेवराई तालुक्यातील मालेगाव बुद्रुक या ठिकाणी समोर आली आहे. रब्बीच्या पिकांना पाणी देण्याचे काम सुरु असतानाच महावितरणकडून (Mahavitaran) कनेक्शन बंद करण्यात आले. वीज (Electricity) बंद केल्याने पीके पाण्याअभावी जळत आहे. त्यामुळे या शेतकऱ्याने सोशल मीडियावर लाईव्ह व्हिडिओ करत विष प्राशन केलं आहे. नारायण वाघमोडे (रा. मालेगाव, बीड) असे या शेतकऱ्याचे नाव आहे. 

खरीपात झालेल्या अतिवृष्टीमुळे हातात काहीच आली नाही. त्यामुळे किमान रब्बीत तरी काही हाती येईल म्हणून नारायण वाघमोडे यांनी पेरणी करून पीकं जगवली. आता पिकांना पाण्याची नितांत गरज असतानाच महावितरणकडून थकीत वीज बिल भरण्यासाठी सांगितले जात आहे. तर बिल न भरल्यास वीज कनेक्शन देखील खंडीत करण्यात येत आहे. दरम्यान नारायण वाघमोडे यांच्या देखील शेतातील वीज कनेक्शन कट करण्यात आले आहे. त्यामुळे डोळ्यासमोर पीके जळत असल्याने त्यांनी टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. 

आत्महत्येचा लाईव्ह व्हिडीओ केला 

शेतातील पीकं जळत असल्याने नारायण वाघमोडे यांनी शेतात जाऊन लाईव्ह व्हिडीओ केला. तसेच व्हिडीओ करतांना विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या लाईव्ह व्हिडिओ पाहून गावातील काही तरुणांच्या प्रकार लक्षात आला. त्यामुळे त्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. तसेच वाघमोडे यांना बीडच्या एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. सध्या त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे. तर महावितरणच्या एका कर्मचाऱ्याच्या त्रासाला कंटाळून वाघमोडे यांनी विषप्राशन केल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. तसेच महावितरणच्या त्या कर्मचाऱ्याविरोधात मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी देखील यावेळी करण्यात आली आहे. 

फडणवीसांच्या आदेशानंतरही कारवाई 

राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी आधीच संकटात सापडला आहे. त्यात आता रब्बीची लागवड झाली असतांना महावितरणकडून थकीत वीज बिलापोटी सक्तीची कारवाई सुरु आहे. विशेष म्हणजे सक्तीची वीज बिल वसुली न करता, कोणत्याही शेतकऱ्याचे थेट वीज कनेक्शन खंडीत करू नयेत असे आदेश राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. मात्र असे असतांना देखील अनेक ठिकाणी सक्तीची वीज बिल वसुली सुरूच आहे. त्यातच आता शेतकऱ्यांवर जीव देण्याची वेळ आल्याचं बीडच्या घटनेतून समोर आले आहे. त्यामुळे फडणवीसांच्या आदेशानंतरही कारवाई सुरूच असल्याचे चित्र राज्यात पाहायला मिळत आहे. 

live reels News Reels

Aurangabad: चार दिवसांपासून वीज नाही म्हणून गावचा नवनिर्वाचित सरपंच झाला ‘अर्धनग्न’

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here