रायगड : कोकण व पश्चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या महाबळेश्वर-पोलादपूर मार्गावरील आंबेवाडी घाट उद्या ४ जानेवारी रोजी एक दिवसासाठी बंद ठेवण्यात येणार आहे. या घाटात पावसाळ्यात अनेक ठिकाणी दरडी कोसळून रस्ता बंद होण्याचे प्रकार घडतात. त्यामुळे दुरुस्ती करण्यासाठी हा घाट उद्या सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत बंद राहणार आहे.

घाटात काही ठिकाणी पाण्याचा निचरा करण्यासाठी मोऱ्या टाकल्या जाणार आहेत. दरड कोसळण्याची शक्यता आहे तिथे दुरुस्ती करण्यात येणार आहे, अशी माहिती महाड येथील सार्वजनिक बांधकाम विभागाकडून देण्यात आली आहे.

करोनामध्ये पत्नी गेली, पतीने हुबेहुब तिचा पुतळा उभारला, सोन्याने मढवलेल्या पुतळ्याची किंमत ऐकून थक्क व्हाल

कोकणातून सातारा आणि महाबळेश्वरकडे जाण्यासाठी पर्यटकांसाठी हा महत्वाचा मार्ग आहे. पावसाळ्यात हा मार्ग दरड कोसळून बंदही करावा लागण्याची वेळ येते. या पार्श्वभूमीवर वेळीच दुरुस्ती करण्यासाठी हा मार्ग उदया बंद करण्यात आला आहे.

पर्यायी मार्ग कोणता?

आंबेवाडी घाटातील मार्ग उद्या बंद ठेवण्यात येणार असल्याने प्रवाशांना वरणघाटमार्गे सातारा व पुण्याकडे जाता येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here