पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका इसमाने आपल्या अंगात दैवी शक्ती असल्याचे भासवले. यामुळे अनेकांचा त्याच्यावर विश्वास बसला. त्याचप्रमाणे पीडित महिलेचा देखील त्या संशयितावर विश्वास बसला. दरम्यान, याचाच फायदा घेऊन पीडित महिलेची मोठी आर्थिक फसवणूक या इसमाने केली आहे. महिलेच्या फिर्यादीवरून, या इसमाने घर देण्याचे आमिष दाखवून पीडित महिलेकडून पाच लाख रुपयांची रक्कम उकळली आहे. एवढेच नव्हे तर या महिलेवर या संशयिताने बलात्कार देखील केल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.
शहरातील उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हा प्रकार आहे. संशयिताच्या विरोधात उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
दरम्यान, आजच्या काळातही अंधश्रद्धा मोठ्या प्रमाणावर आहे. यामुळे फसवणुकीचे आणि विकृत असे अनेक प्रकार घडत आहेत. अनेक लोक अंधश्रद्धेचे बळी पडत आहेत. आजच्या विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या काळातही लोक मोठ्या प्रमाणावर अंधश्रद्धा मानतात त्या पाळतात आणि त्यातून अशा धक्कादायक घटना घडतात. त्यामुळे अंधश्रद्धांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन आहे.