Maharashtra Politics Prakash Ambedkar: शिवसेना ठाकरे गट (Shiv Sena Uddhav Thackeray) आणि वंचित बहुजन आघाडी (Vanchit Bahujan Aghadi) यांच्यात युतीची चर्चा सुरू आहे. या युतीच्या माध्यमातून वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) प्रवेश होईल का, याकडे राज्याचे लक्ष लागले असताना प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. वंचित बहुजन आघाडीची अडवणूक करण्यासाठी भाजप, देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) चाव्या दाबतील असा दावा त्यांनी केला. काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादीने स्वतंत्रपणे निवडणूक लढवावी यासाठीदेखील फडणवीस प्रयत्न करतील असा दावाही त्यांनी केला. 

वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आज पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी विविध मुद्यांवर भाष्य केले. प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले की, शिवसेना आणि आमच्यात जागा वाटपावरून कोणतेही भांडण नाही. आमचा एकही नेता तपास यंत्रणांच्या रडारखाली नाही.त्यामुळे मला वंचित आणि शिवसेना युती स्थिर दिसत असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले. आता शिवसेना काही कारणास्तव निर्णय घेऊ शकली नाही, तरच मला यामध्ये अडचण वाटते. बऱ्याच गोष्टी देवेंद्र फडणवीस यांच्यावर अवलंबून असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले. त्यांना उपमुख्यमंत्री म्हटलं तर कमीपणा वाटतो म्हणून त्यांचे लक्ष्य मुख्यमंत्रीपदाचे आहे. त्यामुळे यासाठी देवेंद्र फडणवीस काय नियोजन करणार याचे विश्लेषण करत असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले. 

देवेंद्र फडणवीस हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या चाव्या दाबण्याचे काम करतील. त्यानंतर काँग्रेसच्या चाव्या दाबण्याचे काम ते करतील असे सांगताना वंचितसोबत युती नको यासाठीदेखील फडणवीस दबाव टाकतील असेही प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले. संघ-भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांच्याकडून काँग्रेस-राष्ट्रवादी स्वतंत्रपणे लढावेत यासाठीदेखील प्रयत्न होतील, असेही आंबेडकर यांनी सांगितले.

राष्ट्रवादीसोबत जाण्यास तयार 

आगामी महापालिका निवडणुकीत शिवसेनेसोबत युतीचा निर्णय झाला असल्याचे प्रकाश आंबेडकरांनी सांगितले. आम्ही शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबत युती करण्यास तयार असल्याचेही प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले. पुणे आणि पिपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादी शिवसेनेला सोबत घेणार का, काँग्रेसही शिवसेनेसोबत येणार का, हे बघावं लागेल असेही प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले. 

live reels News Reels

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here