Marathwada Teachers Constituency Election: मराठवाडा शिक्षक मतदार संघ निवडणूकीच्या (Election) पार्श्वभूमीवर विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर (Sunil Kendrekar)  यांनी आज मतमोजणी स्थळ व स्ट्रॉंग रूमची पाहणी केली. यावेळी औरंगाबादचे जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पांड्ये, पोलीस आयुक्त निखिल गुप्ता यांची देखील उपस्थिती पाहायला मिळाली. येत्या आठ दिवसात मतमोजणी केंद्रात सोयी सुविधा उपलब्ध करून मतमोजणी केंद्र सज्ज ठेवण्याचे आदेश यावेळी सुनील केंद्रेकर यांनी दिले. तसेच निवडणूक कामात कोणत्याही प्रकारचा बेजबाबदारपणा आणि दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

मराठवाडा शिक्षक मतदार संघातील निवडणूक येत्या 30 जानेवारी 2023 रोजी होत असून मतमोजणी 2 फेब्रुवारी रोजी होणार आहे. या पार्श्वभूमीवर विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय, पोलीस आयुक्त निखिल गुप्ता यांनी आज मंगळवारी औरंगाबाद कलाग्राम समोरील  एमआयडीसी चिकलठाणा, प्लॉट नंबर एफ 1/1 येथे करण्यात येणाऱ्या मतमोजणी केंद्राची व स्ट्रॉंग रूमची संयुक्त पाहणी करून विविध कामांच्या सूचना दिल्या.

बेजबाबदार पणा खपवून घेणार नाही:  केंद्रेकर

मतमोजणीच्या अनुषंगाने ज्या ज्या काही सोयी सुविधा उपलब्ध करावयाच्या आहेत त्या तातडीने करा, आजपासून कामाला लागा, निवडणुकीचे काम असल्याने या कामात कुठल्याही प्रकारची दिरंगाई व  बेजबाबदार पणा खपवून घेणार नाही केंद्रेकर यावेळी म्हणाले. तर आठ दिवसात मतमोजणी केंद्राची स्वच्छता, विद्युत,पाणी, मतमोजणी व्यवस्था ,पार्किंग व्यवस्था, आदी सोयीसुविधा उपलब्ध करून सुरक्षा व्यवस्था कडक ठेवण्याचे आदेश दिले. आठ दिवसानंतर मतमोजणीची पूर्वतयारी पाहणी करण्यात येईल असे त्यांनी सांगितले. यावेळी निवडणुक विभागाचे अधिकारी तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग, पोलीस अधिकारी आदि उपस्थित होते.

live reels News Reels

निवडणुकीची अशी आहे तयारी…

मराठवाड्यातील शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी येत्या 5 जानेवारीपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होणार आहे. या निवडणुकीसाठी जिल्हानिहाय 15 कक्ष, तालुकानिहाय एक भरारी पथक, क्षेत्रीय अधिकारी, अधिकारी, व्हिडीओ चित्रीकरण पथकांसह मतदान केंद्रावरील निवडणूक अधिकारी-कर्मचारी असे दोन हजारांवर अधिकारी-कर्मचारी तैनात करण्यात आल्याची माहिती निवडणूक विभागाकडून देण्यात आली आहे. तर या निवडणूकीसाठी 61 हजार 529 मतदार मतदान करणार असून, एकूण 227 केंद्रावर मतदान होणार आहे. त्यामुळे या दृष्टीने सर्वच सातही जिल्ह्यात प्रशासनाकडून तयारी करण्यात येत असून, यासाठी पोलिसांचा देखील तगडा बंदोबस्त ठेवण्याबाबत नियोजन करण्यात येत आहे. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here