सातारा : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटना वाढत आहेत. त्यातच आता सातारा जिल्ह्यात एक संतापजनक प्रकार घडला आहे. उधार घेतलेले पैसे देण्याची ऐपत नाही म्हणून मित्रासोबत आपल्या पत्नीला संबंध ठेवण्यास भाग पाडले. सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यात ही घटना घडली.

मित्राने दिलेले पैसे परत करता येत नव्हते. तो नेहमी पैसे मागायचा. तसेच घरीही पैसे मागायला यायचा. म्हणून या कटकटीतून सुटण्यासाठी पतीने आपल्या पत्नीपुढे घरात आलेल्या मित्राला खूश करायचा प्रस्ताव ठेवला. मात्र, पत्नीने त्या प्रस्तावाला नकार दिला. पत्नीने दिलेल्या नकारानंतरही पतीने धमकावून तिला मित्रासोबत शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडले. पीडित विवाहिता ही २९ वर्षांची आहे. पीडित महिलेने फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात धाव घेऊन पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर पोलिसांनी पतीच्या मित्रासह अन्य काही जणांवर बलात्कारासह अन्य कलमान्वये गुन्हा दाखल केला.

केबिनमध्ये ये जरा.. महिला सहकारी येताच थेट शरीरसंबंधाची मागणी, बळजबरीने मिठी मारली, पुणे हादरलं!
पीडितेच्या पतीने घर बांधण्यासाठी अनेकांकडून उसने पैसे घेतले होते. त्यातील काही लोक पैसे मागण्यासाठी घरी यायचे. सायंकाळी पती घरी आल्यानंतर घरी कोण-कोण पैसे मागायला आले ते पत्नी सांगायची. त्यापैकीच एक पतीचा मित्रही नेहमी पैसे मागण्यासाठी घरी यायचा. हे पत्नी पतीला सांगत होती. याचदरम्यान, “मी मित्राकडून पैसे घेतले आहेत. मात्र, मी त्याला पैसे परत देऊ शकत नाही.” असे आरोपी पतीने आपल्या पत्नीला सांगितलं.

हा Premium Smartphone तब्बल २८ हजारांच्या डिस्काउंटसह खरेदी करण्याची संधी, पाहा ऑफर डिटेल्स

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here