मानसी आपल्या उत्तम नृत्यशैलीमुळे आणि दिलखेचक अदांमुळे कायम प्रेक्षकांमध्ये चर्चेत असते. ‘बाई वाड्यावर या’, ‘वाट बघतोय रिक्षावाला’ या गाण्यांना प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून धरलं. याच गाण्यांमुळे तिला विशेष पसंती मिळाली. परंतु करिअरच्या अन् प्रसिद्धीच्या शिखरावर असताना मानसीच्या जीवनात वादळ आलं. अवघ्या एकाच वर्षात मानलीला घटस्फोटाचं पाऊल उचलावं लागलं.
प्रदीप सोबत बिनसल्याने घटस्फोटाचा अर्ज केल्याचे मानसीने एका मुलाखतीत सांगितले होतं. त्यावर एका नेटकऱ्याने दिलेल्या प्रतिक्रियेला मानसीने सडेतोड उत्तर दिले आहे. ‘देच तू घटस्फोट तुझ्यासारख्या मुली संसाराच्या लायक नसतात. आयुष्यात एकाकी राहण हेच तुझ्या नशिबात आहे, असं म्हणत नेटकऱ्याने मानसीच्या वर्तनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं.
युजर्सच्या याच कमेंटवर उत्तर देताना मानसीने लिहिलं, “माझ्यासारख्या मुली याचा अर्थ काय? संसार आम्हीसुद्धा करु शकतो. पत्नीधर्म काय असतो माहीत आहे ना? सर्वगुणसंपन्न स्त्रिया आपला पत्नीधर्म निभावतात. संसार दोघांचा असतो, एकट्याचा नाही. कलाकार म्हणून आमचा अपमान करणे सोपे आहे पण आम्ही संसार आणि काम सांभाळत पुढे जात असतो. मनु… मनु म्हणून केवळ व्हिडीओ ब्लॉग बनतात-घर नाही चालत..”

मानसी नाईकचं उत्तर
लग्नाच्या नात्यातून वेगळं होण्याची वेळ आता आली…
मानसी नाईकने काही दिवसांपूर्वी हिंदुस्थान टाइम्सला मुलाखत दिली होती. या मुलाखतीत तिने प्रदीपसोबतच्या नात्यावर भाष्य केलं होतं. आमच्यात नेमकं काय चुकलं हे सांगणं सध्या कठीण आहे. आमच्यात काही गोष्टी ठीक होऊ शकल्या नाहीत. पण हे सगळं खूपच वेगात घडलं. आजही माझा प्रेमावर विश्वास आहे. पण एक वेळ अशी होती जेव्हा मला माझं कुटुंब हवं होतं आणि त्यामुळे मी लग्न केलं. मला वाटतं कदाचित तिथेच काहीतरी चुकलं. या लग्नाच्या नात्यातून वेगळं होण्याची वेळ आता आली आहे. प्रदीपबद्दल आणि त्याच्या कुटुंबाबद्दल मला कायम आदर आहे. पण एक स्त्री म्हणून माझा स्वाभिमान आणि स्वतःची काही मतंही महत्त्वाची आहेत” असं मानसी म्हणाली होती.