Indian Science Congress Nagpur : देशात लवकरच ‘कॉन्टेम मिशन’ची (quantum mission) घोषणा करण्यात येणार असून याची संपूर्ण तयारी झाली आहे. दोन वर्षांपूर्वीच याची सुरुवात होणार होती. मात्र कोविडमुळे याला विलंब झाला होता. मात्र आता तयारी पूर्ण झाली असून याची घोषणा करण्यात येणार असल्याचे केंद्र सरकरचे वैज्ञानिक सल्लागार प्रो. अजय सूद (Ajay Sood) यांनी सांगितले. 108 व्या इंडियन सायन्स कॉंग्रेसच्या पहिल्या सत्रात त्यांनी व्याख्यान दिले त्यानंतर पत्रकारांशी ते बोलत होते.
 
प्रो. सूद म्हणाले, सध्या सेमीकंडक्टरची मागणी जगात मोठी मागणी आहे. 50 वर्षांपूर्वी आपण सेमीकंडक्टर मिशन सुरू करण्याची संधी गमावली. त्यामुळे सेमीकंडक्टर उत्पादन आणि पुरवठा करण्यात चीन पुढे आहे. मात्र, आता ‘कॉन्टेम मिशन’ सुरू करण्याची खरी वेळ आली आहे. त्यामुळे ही संधी गमवायची नसल्याने त्यावर सरकारने पावले उचलली असून याची सुरुवात करण्यात येणार आहे.

‘कॉन्टेम मिशन’बद्दल बोलताना सूद म्हणाले…

‘कॉन्टेम मिशन’मध्ये चार घटक आहेत. त्यात कम्युनिकेशन, काॅम्प्युटेशन, सेंसर आणि मटेरिअल चा समावेश आहे. यापैकी कम्युनिकेशन हा घटक सध्या अतिशय प्रगतीपथावर आहे. पूर्वी कम्युनिकेशनमधील पारंपरिक पद्धतीने सिग्नल जायचे. मात्र, आता सिग्नल ‘कॉन्टेम’ पद्धतीने जाईल. अशाच प्रकारे इतरही घटक काम करणार आहेत. यावेळी जीएम क्रॉपवर बोलताना ते म्हणाले की, अनेकजण हा प्रश्न भावनिक पातळीवर नेण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र, विदेशातून येणाऱ्या खाद्य तेलामध्येही जीएम क्रॉपचा वापर करण्यात येतो. त्यामुळे देशातील जीएम क्रॉपबाबत विरोध करण्याला अर्थ नसल्याचे ते म्हणाले. यावेळी पेटंटबाबतच्या प्रश्नावर ते घेऊन अर्थ नसून त्यावर काम करण्यासाठी प्रयत्न व्हावा असे त्यांनी सांगितले. पेटंट घेतल्यावर त्याचा उपयोग न झाल्यास त्याचे फेरनोंदणी करावी लागते. त्यासाठी पैसे लागतात. त्यामुळे पेटंट घेण्यापेक्षा त्या संशोधनाचे फायदे प्रत्यक्षात जमिनीवर आणण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. 

आकडेवारीचे शिकार होऊ नका

live reels News Reels

जगभरात अनेक अहवाल येत असतात. ते आकडेवारीचे शिकार असतात. त्यातील आकडेवारी ती तथ्याला अनुसरुन नसते. एका अहवालात भारतात मोठ्या प्रमाणात कार्बनडाय ऑक्साईडचे उत्सर्जन होत असल्याचा दावा करण्यात आला. मात्र, प्रत्यक्षात परिस्थिती तशी नसून भारत तुलनेत कमी उत्सर्जन होत आहे. मात्र, भारत त्यासाठीही स्वतःहून काम करीत असल्याचे ते म्हणाले. 

राष्ट्रीय रिसर्च फाऊंडेशनमुळे संशोधनाला चालना…

विद्यापीठांमध्ये मोठ्या प्रमाणात संशोधन होत असते. त्यासाठी राष्ट्रीय रिसर्च फाऊंडेशन (National Research Foundation) तयार करण्यात आले असून त्यामाध्यमातून अशा संशोधनासाठी निधी देण्यात येते. यापूर्वी राज्यातील विद्यापीठांचा त्यात समावेश नव्हता. मात्र, आता त्यात राज्यातील विद्यापीठाचा समावेश करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

ही बातमी देखील वाचा…

इस्त्रोची माहिती देणारी गाडी ‘स्पेस ऑन व्हिल्स’ ; इंडियन सायन्स काँग्रेसमधील विशेष आकर्षण

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here