4 January Headlines : महावितरणचे अधिकारी आणि कर्मचारी आज मध्यरात्रीपासून संपावर जाणार आहेत. खासगीकरणाला विरोध (Mahavitaran Strike Against Privatization) करण्यासाठी महावितरणचे कर्मचाऱ्यांनी संपाची हाक दिली आहे. अदानी समूहाला वीज वितरणचा परवाना देण्याच्या हालचाली सुरू असल्याचा आरोप करत महावितरण कर्मचाऱ्यांच्या 30 संघटनांनी हा संप पुकारला आहे. वीज महामंडळाच्या खासगीकरणाच्या निषेधार्थ मुंबई, ठाणे, नाशिक, रायगडसह महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील कामगार संपावर. 86 हजार कामगार, अभियंते आणि अधिकारी आणि 42 हजार कंत्राटी कामगार संपात सहभागी होणार असल्याचा संघटनांचा दावा आहे. विज संपाच्या पार्श्वभुमीवर 30 संघटनांच्या नेत्यांना देवेंद्र फडणविसांनी संघटनांना दुपारी 12 वाजता चर्चेसाठी निमंत्रण दिलं आहे.

आजपासून राष्ट्रवादीची जनजागर यात्रा

राष्ट्रवादीची महिला आघाडी राज्यभर जगजागर यात्रा काढणार आहे. भाजप सरकारच्या धोरणांविरोधात प्रत्येक विधानसभा भागात जाणार आहे आज पुण्यात शरद पवार (sharad pawar) यात्रेला झेंडा दाखवणार आहे, संध्याकाळी 6 वाजता.

पीपल्स रिपब्लिकन पार्टी आणि शिंदे गटात युती होणार? आज  एकत्रित पत्रकार परिषद

live reels News Reels

पीपल्स रिपब्लिकन पार्टी (People’s Republican Party) आणि बाळासाहेबांची शिवसेना (balasahebanchi shivsena) यांच्यात होणार युती होणार? आज जोगेंद्र कवाडे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (cm eknath shinde) एकत्रित पत्रकार परिषद घेऊन युती जाहीर करण्याची शक्यता, दुपारी 1 वाजता 

‘मराठी तितुका मेळवावा’ या विश्व मराठी संमेलनाचे आयोजन

मुंबई – 4 ते 6 जानेवारी 2023 या कालावधीत मुंबईत ‘मराठी तितुका मेळवावा’ या विश्व मराठी संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या संमेलनाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी केंद्रीय मंत्री पियुष गोयल, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मराठी भाषा विभागाचे मंत्री दीपक केसरकर उपस्थित रहाणार आहेत, सकाळी 10 वाजता. 

घाटकोपर पाणी खात्यावर शिवसेना नेते अनिल परब यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा

मुंबई – घाटकोपर पाणी खात्यावर शिवसेना नेते अनिल परब (anil parab) यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा आहे. विभागात पाणी मिळत नाही यासाठी मोर्चा निघणार आहे, सकाळी 11 वाजता. 

मंत्री उदय सामंत यांचा जनता दरबार 

मुंबई – बाळासाहेब भवन येथे मंत्री उदय सामंत (uday samant) यांचा जनता दरबार होणार आहे, सकाळी 9 ते 11 वाजेपर्यंत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here