Mahavitaran Strike: अदानी इलेक्ट्रिकल्स कंपनीने वीज वितरणासाठी विद्युत नियामक आयोगाकडे मागितलेल्या परवान्याच्या विरोधात राज्याच्या वीज कामगार संघटनांनी (Electricity Workers Union) आज मध्यरात्रीपासून तीन दिवसांचा संप (Strike) पुकारला आहे. दरम्यान औरंगाबाद (Aurangabad) परिमंडलातील सुमारे 4 हजार 500 अधिकारी, कर्मचारी या संपात सहभागी झाले आहे. तर दुसरीकडे या काळात वीजपुरवठा (Power Supply) सुरळीत ठेवण्यासाठी शहरासाठी 275 कर्मचाऱ्यांचे आऊटसोर्सिंग केल्याची माहिती महावितरणच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. 

राज्यभरात महावितरणाच्या कर्मचाऱ्यांनी संपाची हाक दिली आहे. 4 ते 6 जानेवारी असे तीन दिवसांचा हा संप असणार आहे. महावितरण कंपनीच्या भांडूप परिमंडलातील कार्यक्षेत्रामध्ये अदानी इलेक्ट्रिकल्स कंपनीने वीज वितरणासाठी विद्युत नियामक आयोगाकडे मागितलेल्या परवान्याच्या विरोधात राज्याच्या वीज कामगार संघटनांनी एकत्र येत या संपाची हक दिली आहे. याच संपात औरंगाबाद परिमंडलातील सुमारे 4 हजार 500 अधिकारी, कर्मचारी सहभागी झाले असून, यात शिपाई ते अतिरिक्त कार्यकारी अभियंत्यांपर्यंतचे अधिकारी सहभागी आहेत. सोबतच आज राज्यभरात संपात सहभागी झालेल्या महावितरण कर्मचारी संघटनांकडून वेगवेगळ्या ठिकाणी निदर्शने केले जाणार आहे. औरंगाबाद मध्यवर्ती कार्यालयासमोर देखील आज निदर्शने केली जाण्याची शक्यता आहे. 

पर्यायी व्यवस्था

मंगळवारी मध्यरात्रीपासून वीज अधिकारी, कर्मचारी संपावर जाणार असल्यामुळे या काळात वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी महावितरणने कंबर कसली आहे. संपाची सुरवात होताच मध्यरात्रीपासून विविध ठिकाणी 275  कर्मचाऱ्यांची आऊटसोर्सिंग केली आहे. हे कर्मचारी संपकाळात 24  तास सेवेत कार्यरत राहणार आहेत. परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी मुंबई येथील मुख्य कार्यालयासह सर्व परिमंडल व मंडल कार्यालयांच्या ठिकाणी संनियंत्रण कक्ष सुरू करण्यात आले असून, हे नियंत्रण कक्ष 24 तास कार्यरत राहणार आहेत. सोबतच तक्रारी किंवा शंका असल्यास महावितरणच्या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा असं आवाहन महावितरणकडून करण्यात आलं आहे.

live reels News Reels

उपमुख्यमंत्र्यांनी बोलावली बैठक…

दरम्यान, या संपावर तोडगा काढण्यासाठी आज दुपारी एक वाजता उपमुख्यमंत्र्यांसोबत बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत काय निर्णय होतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तर अदानी समूहाला वीज वितरणचा परवाना देण्याच्या हालचाली सुरू असल्याचा आरोप करत त्याला महावितरण कर्मचारी संघटनांनी विरोध केला आहे. त्यामुळे या बैठकीत फडणवीस नेमकं काय निर्णय घेणार आणि बैठकीतून काही तोडगा निघतो का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत. 

Mahavitaran Strike :  महावितरण कर्मचाऱ्यांच्या संपाला सुरुवात, कोयनेसह विविध ठिकाणी संपाचा फटका, आजच्या बैठकीत तोडगा निघणार का?  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here