Pune local news | अदानी इलेक्ट्रिसिटी कंपनीने महावितरणच्या कार्यक्षेत्रात समांतर वीज वितरण परवान्यासाठी अर्ज केला आहे. याद्वारे महावितरण कंपनी अदानी समूहाला विकली जाणार असल्याची चर्चा आहे. याचा निषेध म्हणून कर्मचाऱ्यांनी ७२ तासांचा संप पुकारला आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्यासह राज्याच्या ग्रामीण भागांमधील वीजपुरवठा खंडित झाला आहे. सामान्य नागरिकांना याचा प्रचंड फटक बसताना दिसत आहे.

हायलाइट्स:
- माणिकबाग, शिवणे-उत्तमनगर भागातील वीजपुरवठा खंडित
- ७२ तास हा संप सुरू राहणार आहे
- शिवणे औद्योगिक वसाहतीमधील अनेक कारखाने लाईट नसल्याने बंद
आज वीज कर्मचारी, अभियंता, अधिकारीने संपाची हाक दिली आहे. ७२ तास हा संप सुरू राहणार आहे, या प्रश्न विरोधात आज उपमुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस आणि वीज वितरण कर्मचारी संघटनांसोबत बैठक पार पडणार आहे. मात्र आज पुण्याच्या काही भागात विधुत पुरवठा खंडित झाला आहे. औद्योगिक वसाहतींमध्येही वीज नसल्याने कामकाज ठप्प झाले आहे. पुण्यातील शिवणे औद्योगिक वसाहतीमधील अनेक कारखाने लाईट नसल्याने बंद आहेत त्याचा परिणाम जाणवायला सुरुवात झाली आहे. अनेक कारखान्यातील कामगार कामावरती आले असून लाईट नसल्याने त्यांना माघारी जाण्याची वेळ आली आहे. लाईट नसल्याने काम नाही, परिणामी आजचा रोजगारही बुडणार आहे . त्याचबरोबर आज काम पेंडिंग असल्याने त्याचा लोड उद्या येईल असेही कर्मचारी सांगतात आहे. शिवनी औद्योगिक वसाहतीतील अशीच काहीशी परिस्थिती दिसत आहे. अनेक कारखाने लाईट नसल्याने बंद आहेत त्याचा परिणाम जाणवायला सुरुवात झाली आहे. अनेक कारखान्यातील कामगार कामावरती आले असून लाईट नसल्याने त्यांना माघारी जाण्याची वेळ आली आहे. लाईट नसल्याने काम नाही आजचा रोजगारही बुडणार आहे . त्याचबरोबर आज काम पेंडिंग असल्याने त्याचा लोड उद्या येईल अशी भावना कर्मचारी व्यक्त करत आहे.
याशिवाय, पिंपरी-चिंचवड येथील आकुर्डी आणि भोसरी परिसरातील लघुद्योगांनाही वीज नसल्याने मोठा आर्थिक फटका बसणार नाही. पिंपरी परिसरात एकूण १२००० लहानसहान कंपन्या आहेत. या कंपन्या वीज नसल्याने एक दिवस बंद राहिल्यास त्यामुळे प्रचंड आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे.
नगरमधील तीन सबस्टेशन
महावितरण कर्मचाऱ्यांच्या संपामुळे अहमदनगर जिल्ह्यातील तीन सबस्टेशन बंद झालेत, त्यात जामखेड, नेवासा आणि शहरातील भिंगार सबस्टेशनचा समावेश आहे. महावितरणच्या अहमदनगर कार्यालयातील ५२८ पैकी ३६ कर्मचारी कामावर हजर असल्याची माहिती प्रभारी अधीक्षक अभियंता संजय खंडारे यांनी दिली. त्यात एक अधीक्षक अभियंता आणि सहा कार्यकारी अभियंता यांचा समावेश आहे. जी तीन सबस्टेशन बंद आहेत तिथे फिडर ट्रिप झाल्याने वीज पुरवठा बंद असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, खासगी कर्मचाऱ्यांमार्फत हे फिडर लवकरच सुरू केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. सोबतच जिल्ह्यात कुठेही वीज पुरवठा बंद होणार नाही, याची काळजी घेतली जाणार आहे. जर कुठे पुरवठा बंद झालाच तर तो तातडीने सुरू करण्याचा प्रयत्न असेल, अशी माहिती अधीक्षक अभियंता संजय खंडारे यांनी दिली.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.