Ncp News : नागपूरमधील विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल वक्तव्य केलं होतं. संभाजी महाराज हे धर्मवीर नव्हते, असं अजित पवार म्हणाले होते. पण त्यावरून सत्ताधारी भाजपने आक्रमक होत राज्यात आंदोलनं आणि निषेध सुरू केला. यावरून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या आणि राजकारणही तापलं. शरद पवार यांनीही या मुद्द्यावर राष्ट्रवादी पक्षाची भूमिका मांडली. आता अजित पवार यांनी आज पत्रकार परिषद घेतली.

 

ajit pawar clarification on chhatrapati sambhaji maharaj statement
महापुरुषांबद्दल मी कधीच वादग्रस्त वक्तव्य केलं नाही, अजितदादा त्या विधानावर ठाम
मुंबई : महापुरुषांबद्दल वादग्रस्त विधान भाजपच्या राज्यपालांनी केलं, मंत्र्यांनी केलंय आणि प्रवक्त्यांनी केलं आहे. मी वादग्रस्त विधान केलेलं नाही. मी आजही माझ्या विधानाशी ठाम आहे, असं विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले. शरद पवार हे आमचे सर्वोच्च नेते आहेत. त्यामुळे त्यांनी सांगितलेल्या मताशी मी सहमत राहणार, असं म्हणत अजित पवार यांनी विरोधकांकडून होत असलेल्या आरोपांना प्रत्युत्तर दिलं आहे. छत्रपती संभाजी महाराज स्वराज्यरक्षक आहेत. महापुरुषांबाबत मी कधीच बेताल वक्तव्य केली नाहीत, असं अजितदादा म्हणाले.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here