Devendra Fadnavis: काल रात्रीपासून महावितरण कर्मचारी संपावर होते. त्यानंतर आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी करत या संपावर तोडगा काढला. त्यानंतर कर्मचाऱ्यांनी हा संप मागे घेतला.

हायलाइट्स:
- महावितरण कर्मचाऱ्यांचा संप मागे
- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मध्यस्थी
- वीज कर्मचाऱ्यांसाठी मोठ्या घोषणा
महावितरणचे कर्मचाऱ्यांनी संप पुकारला होता. त्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी वीज वितरण कंपन्यांच्या ३२ संघटनांशी चर्चा केली आणि ही चर्चा साकारात्मक झाल्याचं त्यांनी सांगितलं. राज्य सरकारला कंपन्यांचं खासगीकरण करायचं नाहीये, याउलट सरकार ३ कंपन्यांमध्ये ५० हजार कोटींची गुंतवणूक करणार आहे, असंही फडणवीसांनी सांगितलं.
त्यासोबतच सरकार वयोमर्यादा वाढवून कर्मचाऱ्यांची भरती करणार. महावितरणमधील कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी सवलती वाढवणार, असंही देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.