Deven Bharti : देवेन भारती यांच्यासाठी खास विशेष पोलीस आयुक्तपदाची निर्मिती केली गेल्याने राजकीय वर्तुळासह पोलीस खात्यात देखील उलट सुलट चर्चांना सुरुवात झालीये. गेल्या काही आठवड्यात पोलीस दलातील अनेक वादविवादानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच नवीन पदाच्या निर्मितीसाठी जोर लावला असल्याची माहिती सूत्रांनी दिली. येत्या काही महिन्यांत मुंबई महानगरपालिका निवडणुकांसारख्या महत्त्वाच्या घटना असल्याने शहरातील कायदा व सुव्यवस्था हाताळण्यासाठी हे पद महत्त्वाचे ठरणार आहे.

हायलाइट्स:
- मविआने ज्यांना साईडलाईन केलं,
- त्यांच्यासाठीच स्पेशल पदाची निर्मिती,
- BMC निवडणुकीआधी फडणवीसांचा मास्टरस्ट्रोक!
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना देवेन भारती पोलीस दलात महत्त्वाच्या पदावर होते. मात्र महाविकास आघाडी सत्तेत आल्यानंतर देवेन भारती यांची वाहतूक विभागात सहआयुक्तपदी नियुक्ती केली गेली. तेव्हापासून देवेन भारती फारसे प्रकाशझोतात नव्हते. मात्र शिंदे फडणवीसांचं सरकार येताच महत्त्वाच्या पदावर त्यांची वर्णी लागणार, अशी अटकळ बांधली जात होती. अखेर सत्तांतरानंतरच्या सहा महिन्यात भारती यांच्यासाठी पोलीस दलात विशेष पद निर्मिलं गेलं आहे. यापूर्वी भारती यांनी मुंबई शहराचे सह पोलीस आयुक्त (कायदा आणि सुव्यवस्था) भूषवलं आहे.
गेल्या काही आठवड्यात पोलीस दलातील अनेक वादविवादानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच नवीन पदाच्या निर्मितीसाठी जोर लावला असल्याची माहिती सूत्रांनी दिली. येत्या काही महिन्यांत मुंबई महानगरपालिका निवडणुकांसारख्या महत्त्वाच्या घटना असल्याने शहरातील कायदा व सुव्यवस्था हाताळण्यासाठी हे पद महत्त्वाचे ठरणार आहे.
कोण आहेत देवेन भारती?
- देवेन भारती १९९४ सालच्या बॅचचे IPS अधिकारी
- फडणवीस मुख्यमंत्री असताना सर्वात शक्तीशाली IPS म्हणून ओळख
- फडणवीस यांच्या अतिशय विश्वासातले, मर्जीतले अधिकारी म्हणून भारती यांचा परिचय
- भारती यांनी महाराष्ट्र राज्य दहशतवाद विरोधी पथकाचे (एटीएस) नेतृत्व केले होते
- त्यापूर्वी ते अतिरिक्त पोलीस आयुक्त (गुन्हे) होते.
- २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यासह शहरातील अनेक मोठ्या गुन्ह्यांच्या तपासातही त्याचा सहभाग होता.
- महाविकास आघाडीच्या काळात भारतींची वाहतूक विभागात बदली
- आता सत्तांतरानंतर फडणवीसांकडून विशेष पोलीस आयुक्तपदाची निर्मिती
- मुंबई महापालिका निवडणुकीअगोदर त्याच पदावर देवेन भारती यांची नियुक्ती
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.