वाचा:
राज्यसभेत काल झालेल्या नवनिर्वाचित खासदारांच्या शपथविधीच्या वेळी यांनी ‘जय भवानी, जय शिवाजी’ अशी घोषणा दिली होती. त्याला सभापती व्यंकय्या नायडू यांनी आक्षेप नोंदवला होता. ही घोषणा रेकॉर्डवरून काढून टाकण्यात येईल, असं स्पष्ट केलं. त्यावरून आता राजकारण रंगलं आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना या तिन्ही पक्षांनी भाजपला घेरलं आहे. खुद्द संजय राऊत यांनीही भाजपचं तोंड बंद का? संभाजी भिडे यांनी आता सांगली, सातारा बंदची हाक का दिली नाही,’ असा प्रश्न सकाळी ट्वीटच्या माध्यमातून उपस्थित केला होता.
वाचा:
उदयनराजे यांनीही या सगळ्या वादावर खुलासा केला. राज्यसभेत छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान झालाच नाही. सभागृहात असं काही घडलंच नाही. शरद पवारही तिथं होते. त्यामुळं कुणीही राजकारण करू नये,’ असं त्यांनी म्हटलं आहे. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना संजय राऊत यांनी व्यंकय्या नायडू यांना क्लीन चिट दिली. नायडू हे उपराष्ट्रपती आहेत. राज्यसभेचे सभापती आहेत. नियमांचं काटेकोर पालन करणारे आहेत. त्यांच्या दृष्टीनं म्हणाल तर ते बरोबर आहेत. त्यांच्याइतका संसदीय लोकशाही व कामकाजाचे कायदे माहीत असलेला नेता आजवर मी पाहिला नाही. आम्ही सगळे त्याचे ऐकतो. त्यांचा आदर करतो. हा वाद वाढू नये असं आम्हालाही वाटतं. पण शिवरायांबद्दल आमच्या काही भावना आहेत. नियम आणि भावना या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. ‘जय भवानी आणि जय शिवाजी’ ही घोषणा नियमबाह्य किंवा घटनाबाह्य नाही. ती असू नये, असं आमचं म्हणणं आहे. ‘जय हिंद आणि वंदे मातरम्’ इतकीच ही घोषणा महत्त्वाची आहे,’ असं राऊत म्हणाले.
वाचा:
‘यापूर्वीही सभागृहात अनेक प्रकारच्या घोषणा झालेल्या आहेत. संसदेतील काही सदस्य आपापल्या अस्मितेशी संबंधित घोषणा देत असतात. त्या कामकाजातून किती वेळा काढल्या जातात याची मला माहीत नाही. पण शिवाजी महाराज हा श्रद्धेचा विषय असल्यानं संपूर्ण महाराष्ट्रानं त्याबद्दल मत मांडलं आहे,’ असंही राऊत यांनी सांगितलं.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times