Dhananjay Munde Accident: राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या कारचा आज अपघात झाला आहे. परळीकडे जात असताना त्यांच्या गाडीला अपघात झाल्याची माहिती त्यांनी स्वतः फेसबुक पोस्टद्वारे दिली आहे. चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्यानं हा अपघात झाला असून यात धनंजय मुंडे यांच्या छातीमध्ये दोन ठिकाणी छोटेसे फॅक्चर झाल्याचे निदर्शनास आले आहे. त्यांना उपचारसाठी मुंबईमध्ये आणण्यात आले आहे. ज्यावेळी त्यांचा अपघात झाला तेव्हा ते लक्झरी कार BMW X7 ने प्रवास करत होते. धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्याकडे असलेली ही 2 कोटींची कार किती सुरक्षित आहे, हे जाणून घेऊ…

Dhananjay Munde Bmw Car: इंजिन आणि पॉवर 

BMW X7 xDrive40i व्हेरिएंटमध्ये 3.0-लिटर टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिन आहे. हे इंजिन 340 hp ची कमाल पॉवर आणि 450 Nm चा पीक टॉर्क जनरेट करते. तर xDrive30d व्हेरिएंटमध्ये 3.0-लिटर टर्बोचार्ज्ड डिझेल इंजिन आहे. हे इंजिन 265 hp ची कमाल पॉवर आणि 620 Nm चा पीक टॉर्क जनरेट करते.

Dhananjay Munde Bmw Car: टॉप स्पीड 

पेट्रोल इंजिनचा टॉप स्पीड 245 किमी प्रतितास आहे आणि ही कार 6.1 सेकंदात 0 ते 100 किमी प्रतितास वेग वाढवू शकते. तर डिझेल इंजिनचा टॉप स्पीड 227 kmph आहे आणि 0 ते 100 kmph चा वेग पकडण्यासाठी 7 सेकंद लागतात. दोन्ही इंजिन 8-स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्सशी जोडलेले आहेत. दोन्ही xDrive व्हेरिएंट आहेत म्हणजे चारही चाकांमध्ये पॉवर Transfer केली जाते.

Dhananjay Munde Bmw Car: फीचर्स 

यात एलईडी टेल लॅम्प, टू-पार्ट इलेक्ट्रिक टेलगेट, लेझर लाइट्ससह हेडलॅम्प आणि 22.0-इंच अलॉय व्हील आहेत. केबिनच्या आत, गियर शिफ्टर आणि इंजिन स्टार्ट/स्टॉप पुश बटण काचेचे बनलेले आहे. यात पॅनोरामिक सनरूफ, अॅम्बियंट लाइटिंग, 4-झोन क्लायमेट कंट्रोल, 360-डिग्री कॅमेरा, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम सारखे फीचर्स देण्यात आले आहेत.

live reels News Reels

Dhananjay Munde Bmw Car: सुरक्षा फीचर्स

BMW 7 Series 745Le xDrive हे टॉप-एंड मॉडेल 6 एअरबॅग्ज (ड्रायव्हर, पॅसेंजर, 2 कर्टेन, ड्रायव्हर साइड, फ्रंट पॅसेंजर साइड), फॉरवर्ड कोलिजन वॉर्निंग, ऑटोमॅटिक इमर्जन्सी ब्रेकिंग, हाय-बीम असिस्ट, सीट बेल्ट वॉर्निंग यासारख्या सुरक्षा फीचर्ससह येते. 

Car loan Information:
Calculate Car Loan EMI

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here