धर्मेंद्र कोरे, जुन्नर : जुन्नर तालुक्यात बिबट्याचा मोठ्या प्रमाणात वावर आहे. शेतकऱ्यांना अनेक ठिकाणी बिबट्याचं दिवसाढवळ्या दर्शन होतं. अनेकांवर बिबट्याकडून हल्लेही करण्यात आले आहेत. मात्र शिकारीच्या प्रयत्नात असणारा बिबट्या चक्क वडाच्या झाडात अडकला. शर्तीचे प्रयत्न करून देखील बिबट्याला स्वतःला त्यातून सोडवता येत नव्हतं. सुटकेसाठी बिबट्याची चांगलीच धडपड सुरू होती. जुन्नर तालुक्यातील बेल्हे-गुळूंचवाडी येथील धायटेवस्तीवर असणाऱ्या वडाच्या झाडात बिबट्या अडकला होता.

गुळुंचवाडी (बेल्हे,ता.जुन्नर) येथील मारूती भांबेरे यांच्या मालकी गटातील वडाच्या झाडावर एक बिबट्या अडकल्याची घटना घडली. वडाच्या झाडावर एका सर्विस केबलमध्ये अडकलेल्या बिबट्याची वनविभाग आणि बिबट्या निवारा केंद्राच्या पथकाने सुटका केली आहे. अडकलेला बिबट्या हा सहा वर्षाची मादी असून त्याला डार्ट मारून बेशुद्ध करुन सुरक्षित बाहेर काढण्यात आलं. बिबट्याला जाळीत सुरक्षित पकडून माणिकडोह बिबट्या निवारा केंद्रात पाठवण्यात आलं आहे.

हेही वाचा –
Pune News : ट्रेन पकडताना महिलेचा तोल गेला; RPF जवानाने वाचवला जीव, थराराक VIDEO

junnar-leopard

पहाटेपासूनच बिबट्या झाडावर अडकला असल्याची माहीती अतुल भांबेरे यांनी वनविभागाला दिली होती. त्यानुसार सहाय्यक वनसंरक्षक अमित भिसे यांच्यासह ओतूर वनपरिक्षेत्रातील कर्मचाऱ्यांचं पथक तसंच बिबट्या निवारा केंद्राचं पथक घटनास्थळी दाखल झालं. त्यानंतर सकाळी सहा वाजल्यापासून ते ९ वाजेपर्यंत बिबट्याची सुटका करण्यासाठी पथकाकडून प्रयत्न सुरु होते. निवारा केंद्रातील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. चंदन सावणे यांनी बिबट्याला डार्ट मारून बेशुद्ध केलं. त्यानंतर झाडाखाली जाळी लावून बिबट्याला अलगद त्या जाळीवर सोडून रेस्क्यू करण्यात आलं. रात्रीच्या सुमारास भक्ष्याच्या शोधात असताना झाडात अडकला असल्याचा अंदाज त्यांच्याकडून व्यक्त करण्यात आला.

junnar-bibtya

हेही वाचा – Pune News: माकडांसोबत सेल्फीचा मोह महागात, पुण्याच्या शिक्षकाचा दरीत पडून मृत्यू

junnar-loepard-pune

झाडावरून पहिल्यांदाच अशाप्रकारे रेस्क्यू

जुन्नर वनविभागाच्या कार्यक्षेत्रात विहीरीत पडलेल्या, खड्यात पडलेल्या तसंच घरात अडकलेल्या बिबट्यांचं रेस्क्यू अनेकवेळा करण्यात आलं होतं. मात्र झाडावर अडकलेल्या बिबट्याचं पहिल्यांदाच रेस्क्यू करण्यात आल्याचं जुन्नर वनविभागाकडून सांगण्यात आलं आहे.

junnar-bibtya-pune

रेस्क्यू दरम्यान अचानक बिबट्या त्यातून निसटला असता, तर ते जोखमीचं होतं, पण योग्य पद्धतीने हे रेस्क्यू ऑपरेशन पार पडल्याने सर्वांनीच सुटकेचा निश्वास सोडला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here