Eknath Khadse:  एकनाथ खडसे यांनी आपल्या शेत जमिनीमधून अवैध रित्या गौण खनिज  उत्खनन करून घोटाळा केला असल्याचे पुरावे आपल्याकडे असल्याचे आणि त्यांच्या विरोधात दंडात्मक कारवाई होणार असल्याचं वक्तव्य आमदार चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. 

नागपूर अधिवेशनात मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांनी गौण खनिज घोटाळा केल्याचा आरोप केला होता. यावरून चांगलंच वातावरण तापलं असून त्याचवेळी राधाकृष्ण विखे पाटील यांनी चौकशीचे आदेश दिल्याने एकनाथ खडसे यांच्यासह खडसे कुटुंबिय अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अशातच आता आमदार चंद्रकांत पाटील यांनी याबाबत महत्वपूर्ण माहिती दिली आहे. घोटाळा केल्याचे सगळे पुरावे आपल्याकडे असून खडसे यांच्यावर कारवाई होणारच असा इशारा त्यांनी दिला आहे. 
 
एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांच्या नावे असलेल्या शेत जमिनी मधून बेकायदेशीर रित्या चारशे कोटी रुपयांचे गौण खनिज उत्खनन केले गेल्याचा आणि त्याची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी मुक्ताई नगर येथील आमदार चंद्रकांत पाटील यांनी हिवाळी अधिवेशनात केली होती. त्यांच्या या मागणी नुसार सरकारने दखल घेत या ठिकाणी पाहणी साठी गौण खनिज विभागाचे पथक तपासणी साठी दाखल झाले आहे.

दरम्यान या पार्श्वभूमीवर आमदार चंद्रकांत पाटील यांच्याशी बातचीत केली असता त्यांनी खडसे परिवारावर सत्तेचा दुरुपयोग करून आपल्या शेत जमिनी मधून बेकायदेशीररित्या गौण खनिज उत्खनन केल्याचा आरोप केला आहे. यासंदर्भात आपल्याकडे अनेक पुरावे असल्याचं  चंद्रकांत पाटील यांनी म्हटल आहे. खडसे यांनी चार कोटीची असली तरी चारशे कोटीचे गौण खनिज काढले गेले असल्याचा आपला अंदाज आहे. आता चौकशी लागली आहे, त्यात काय ते समोर येणार आहे. दूध का दूध पाणी का पाणी होणार आहे.

दंडात्मक कारवाई होणार…

किती दंड होणार हे आजचं मला सांगता येणार नाही, मात्र बिनशेती जमिनीतून हे गौण खनिज काढले गेले आहे. हे सर्व सामान्य माणसाला शक्य नाही तर सत्तेचा दुरुपयोग करून करण्यात आले आल आहे. अस मला वाटत, सर्व सामान्य जनते साठी वेगळा न्याय आणि राजकीय पुढाऱ्यांच्या साठी वेगळा न्याय असू शकत नाही, मात्र ज्या प्रमाणे सर्व सामान्य जनतेला दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागते तशाच पद्धतीने खडसे यांच्यावर ही दंडात्मक कारवाई होईल असं आमदार चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय.

live reels News Reels

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here