Dhananjay Munde Health Updates:  राज्याचे माजी मंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे  (Dhananjay Munde) यांचा आज भीषण अपघात (Accident) झाला. या अपघातानंतर त्यांना एअर अॅम्बुलन्सच्या माध्यमातून मुंबईतील ब्रीच कॅन्डी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. धनंजय मुंडे  (Dhananjay Munde Health Updates)यांची प्रकृती स्थिर असून कोणतीही काळजी करण्याचे कारण नसल्याचे सांगण्यात  आले आहे. 

अपघातामध्ये धनंजय मुंडे यांच्या छातीमध्ये किरकोळ मार लागला आहे. सध्या मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यांच्या तब्येतीबाबत कोणत्याही प्रकारचे काळजीचे कारण नसल्याचे कळविण्यात आले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे हे ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल झाल्यानंतर विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यासह खासदार सुनील तटकरे, आमदार अनिकेत तटकरे हे ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल झाले. त्यांनी धनंजय मुंडे यांची भेट घेऊन आस्थावाईकपणे चौकशी केली. त्याशिवाय, त्यांनी पुढील उपचाराबाबत रुग्णालय प्रशासनाकडून माहिती घेत सूचना केली. धनंजय मुंडे यांना लवकर बरे होण्याबाबत सदिच्छा व्यक्त केल्या. 

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार, खासदार सुप्रियाताई सुळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, छगन भुजबळ यांच्यासह राज्यातील अनेक नेत्यांनी धनंजय मुंडे यांच्या प्रकृतीबाबत फोनवरून चौकशी केली. त्यांना लवकर आराम मिळावा याबाबत आपल्या सदिच्छा व्यक्त केल्या आहेत.

live reels News Reels

असा झाला अपघात

धनंजय मुंडे हे परळी शहरातील काही नागरिकांच्या वैयक्तिक भेटीगाठी घेत होते. त्यानंतर ते ग्रामीण भागात गेले आणि ग्रामीण भागातून साडेअकरा वाजता रात्री परळी शहरात आले. परळी शहरात आल्यानंतर ते आपल्या राहत्या घराकडे निघाले. 12:30 वाजता धनंजय मुंडे यांची त्यांची बीएमडब्ल्यू (BMW) त्यांच्या घराजवळ असलेल्या मौलाना आझाद चौकामध्ये आली. यावेळी धनंजय मुंडे यांच्या गाडीची स्पीड चाळीस ते पन्नास असण्याची शक्यता आहे. यावेळी चालकाचा ताबा गाडीवरला सुटल्याने त्यांची गाडी मौलाना आझाद चौकाला जाऊन आदळली. या अपघातामध्ये बीएमडब्ल्यू कारचा पुढच्या भागाच मोठं नुकसान झालं आहे. अपघातानंतर धनंजय मुंडे यांना दुसऱ्या गाडीने त्यांच्या निवासस्थानी दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी त्यांच्या घरी जाऊन तपासणी केली. वैद्यकीय चाचणीत धनंजय मुंडे यांच्या छातीमध्ये दोन ठिकाणी फ्रॅक्चर असल्याचे दिसून आले. 

इतर महत्त्वाच्या बातम्या:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here