5 January Headlines : अपक्ष आमदार देवेंद्र भुयार यांची नार्को टेस्ट करा या मागणीसाठी वरुडमध्ये आजपासून सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांचा उपोषण सुरू झालं आहे. यासह आज दिवसभरातील घडणाऱ्या महत्वाच्या घडामोडी जाणून घेणार आहोत. आदित्य ठाकरेंनी सिनेट निवडणुकीसाठी पदाधिकाऱ्यांची महत्वाची बैठक बोलवली आहे. आदित्य ठाकरेंनी जिंकायची सिनेट निवडणुक त्यासाठी सर्व पक्षातल्या कार्यकर्त्यांना ॲक्टिव्ह मोडवर आणण्याचं काम सुरू केलंय. योगी आदित्यनाथ दोन दिवसांच्या मुबंई दौऱ्यावर आहेत.
अपक्ष आमदार देवेंद्र भुयार यांच्या नार्को टेस्टच्या मागणीसाठी अमरावतीत सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांचे उपोषण
अपक्ष आमदार देवेंद्र भुयार यांची नार्को टेस्ट करा या मागणीसाठी वरुडमध्ये आजपासून सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांचा उपोषण सुरू झालं आहे. 2019 च्या विधानसभा प्रचार दरम्यान 19 ऑक्टोबर 2019 रोजी सकाळी 5.30 वाजता देवेंद्र भुयार यांच वाहन अडवून सहा अज्ञातांनी वाहन अडवून तीन गोळ्या झाडल्या आणि वाहनाची जाळपोळ केली अशी तक्रार देवेंद्र भुयार यांचे ड्रायव्हर आकाश नागापुरे यांनी शेंदूरजना घाट पोलिसात तक्रार दिली होती. पोलिसांनी याप्रकरणी तपास केला पण अज्ञात 6 जण आणि इंहोव्हा वाहनाचा शोध लागला नाही. अखेर 10 डिसेंबर 2020 रोजी पोलिसांनी हे प्रकरण कायमस्वरूपी तपासात ठेवून क्लोझर रिपोर्ट दिला. आता नेमकं ते वाहन जाळलं कोणी आणि गोळ्या खरच झाडल्या होत्या का हा मुद्दा घेत वरुड मधील सर्वपक्ष पदाधिकारी आक्रमक झाले आणि त्यांनी आरोप केलाय. काहीजण या विरोधात उपोषणाला बसणार आहेत.
अनिल परबांची संपत्ती ताब्यात घेण्यात येणार
अनिल परबांच्या प्रॉपर्टीवर ईडीने कारवाई केले. त्यात रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली येथील मुरुड समुद्रकिनारा येथे असलेले साई रिसॉर्ट सुद्धा आहे. त्यावर ईडीकडून नोटीस लावण्यात आलीये. आजपासून ती प्रॉपर्टी ईडी आपल्या ताब्यात घेण्यास सुरुवात करणार आहे.
मुंबईत आदित्य ठाकरे यांनी बोलवली पदाधिकाऱ्यांची बैठक
आदित्य ठाकरेंनी सिनेट निवडणुकीसाठी पदाधिकाऱ्यांची महत्वाची बैठक बोलवली आहे. आदित्य ठाकरेंनी जिंकायची सिनेट निवडणुक त्यासाठी सर्व पक्षातल्या कार्यकर्त्यांना ॲक्टिव्ह मोडवर आणण्याचं काम सुरू केलंय.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी मुंबईच्या दौऱ्यावर
योगी आदित्यनाथ दोन दिवसांच्या मुबंई दौऱ्यावर आहेत. सकाळी 9 ते 10 वाजेपर्यंत विविध बॅंकांच्या अधिकाऱ्यांबरोबर चर्चा करतील. दुपारी 12 ते 2 वाजेपर्यंत जीआयएस रोड शोमध्ये सहभाही होतील. संध्याकाळी 6 वाजता बॉलिवूड अभिनेते आणि दिग्जांची भेट घेतील.
News Reels
सांगलीतील वंजारवाडीच्या सरपंचाचा पदभार आणि शपथविधी सोहळा
सरपंच पदाचे वाढलेले अधिकार पाहून यंदाच्या निवडणूकीत सरपंच पदाची निवडणूक चुरशीची झाली. यात जे आता गावचे सरपंच झाले त्याना आपण गावचा जणू मुख्यमंत्री असल्यासारखे वाटतेय. असेच तासगाव तालुक्यातील वंजारवाडी गावच्या सरपंच पदावर विराजमान झालेल्या अरुण खरमाटे यांना वाटतेय. त्यामुळे त्यांनी चक्क सरपंच पदाचा पदभार आणि शपथविधी सोहळा गावात आयोजित केलाय. यासाठी त्यांनी जसे मुख्यमंत्री पदाचे शपथविधी सोहळे पार पडतात तसेच सरपंच पदाच्या पदभार आणि शपथविधी सोहळ्याचे नियोजन केलेय. बीडीओच्या उपस्थितीत ते शपथ घेणार आहेत. यात आपल्या कर्तव्याची शपथ घेऊनच ते कार्यभार स्वीकारणार आहेत, सकाळी 10 वाजता. (कोल्हापूरचं लाईव्हयु जाणार आहे. तो कार्यक्रम सुरू झाल्यानंतर ही बातमी चालवायची आहे. आधीपासून चालवू नका.)
औरंगाबादमध्ये अडव्हॅनटेज महाराष्ट्र एक्स्पो – 2023 चे उद्घाटन
औरंगाबाद-डीएमआयसी ऑरीक सिटी शेंद्रा येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत अडव्हॅनटेज महाराष्ट्र एक्स्पो – 2023 चे उद्घाटन होणार आहे, सकाळी 11.15 वाजता. दुपारी 12.30 वाजता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची मराठवाडा असोसिएशन ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज अँड एग्रीकल्चर याच्या विविध प्रश्नाबाबत समिती सभागृहामध्ये बैठक.
खासदार नवनीत राणांच्या जात पडताळणी प्रकरणात शिवडी न्यायालयात सुनावणी
खासदार नवनीत राणा जात पडताळणी प्रकरणात शिवडी न्यायालयात सुनावणी होणार आहे.
पुणे जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची बैठक
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत पुणे जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची बैठक होणार आहे.
नागपुरात इंडियन सायन्स काँग्रेसमध्ये महिलांसाठी विशेष सत्र
नागपुरात इंडियन सायन्स काँग्रेस सुरू असून आज महिलांसाठी विशेष सत्र होणार आहे. इंडियन वुमन्स सायन्स काँग्रेस या नावाने होणाऱ्या सत्रात देशभरातील पाच हजार महिला सहभागी होणार असल्याचा आयोजकांचा दावा आहे. या सत्रात पद्मश्री आणि सीड वुमन म्हणून ओळख असलेल्या राहीबाई पोपरे उपस्थित राहणार आहेत. तसेच टीना अंबानी आणि कांचन गडकरी या उपस्थित राहणार आहेत. यंदाच्या इंडियन सायन्स काँग्रेसची मुख्य थीम शाश्वत विकास आणि महिला सक्षमीकरणासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान अशीच आहे. त्यामुळे उद्याचे इंडियन वुमन्स सायन्स काँग्रेसचे सत्र लक्षवेधी ठरणार आहे.
देवेन भारती आज विशेष पोलिस आयुक्त म्हणून पदभार स्वीकारणार
देवेन भारती आज विशेष पोलिस आयुक्त म्हणून पदभार स्वीकार करणार आहेत. विशेष पोलीस आयुक्त पदाचे आदेशाची प्रत आज महाराष्ट्र सरकारने जारी केली आहे. रिपोर्टर – फैजल
प्रभाग रचनेवरील ठाकरे गटाच्या याचिकेवर सुनावणी
मुंबई महानगरपालिका प्रभाग रचने विरोधात ठाकरे गटाकडून दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर आज मुंबई उच्च न्यायालय सुनावणी होणार आहे.
सातारा जिल्ह्यातील मांढरदेवीची यात्रा
सातारा जिल्ह्यातील मांढरदेवीची यात्रा उद्यापासून सुरु होतेय. तीन दिवस चालणाऱ्या या यात्रेसाठी प्रशासनाकडून निर्बंध लागू करण्यात आलेत. हे निर्बंध याच कालावधीत होणाऱ्या पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील कांजळे इथल्या काळुबाई देवीच्या यात्रेलाही लागू असणार आहेत.
1. यात्रेच्या काळात पशुहत्या करण्यास मनाई असे.
2. कोंबड्या, बकऱ्या, बोकड इत्यादी प्राण्यांच्या या भागात वाहतुकीस मनाई असेल.
3. मांढरदेव परिसरात वाद्ये आणण्यास आणि वाजवण्यास मनाई असेल.
4. मांढरदेव परिसरातील झाडांवर खिळे ठोकणे, काळ्या बाहूल्या अडकवणे, लिंबू आणि बिब्बे ठोकणे, भानामती करणे, करणी करणे यास बंदी असेल.
5. मंदिर परिसरात नारळ फोडणे आणि तेल वाहण्यास मनाई असेल.
6. मंदिर परिसरात मद्य बाळगणे आणि पीणे यास मनाई असेल.