Jitendra Awhad : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath shinde) हे व्हाईसरॉय ॲाफ महाराष्ट्र (Viceroy of Maharashtra) आहेत. व्हाईसरॉयच्या हातात कायदा होता, तो कोणाचंही ऐकायचा नाही तसे हे व्हॉईसरॉय असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री जिंतेद्र आव्हाड (NCP Mla Jitendra Awhad) यांनी मुख्यमंत्र्यांवर केली. नेरुळ येथे आगरी कोळी महोत्सवाच्या उद्घाटन जितेंद्र आव्हाड यांच्या हस्ते झालं. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर निशाणा साधला. 

प्रभाग रचनेसाठी खर्च केलेल्या 1 हजार 500 कोटींचं काय झालं?

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका हे सरकार लावत नाही. याआधी केलेले तीनचे प्रभाग चार करा अशी मागणी एकनाथ शिंदे यांनी केल्याचे आव्हाड यावेळी म्हणाले. त्यामुळं प्रभाग रचनेसाठी खर्च केलेले 1 हजार 500 कोटींचे काय झाले? असा सवालही जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी केला. निवडणुकीत नशिब पोलीस मतदान करीत नाहीत. नाहीतर ऐवढच राहिलय आता. पोलिसांना सांगतील जाऊन तुम्ही बटन दाबून या आपण बघू अशा खोचक टोलाही आव्हाडांनी मुख्यमंत्री शिंदेंना लगावला. 

आम्ही सांगू तो कायदा, अशा प्रकारचा कायदा महाराष्ट्रात राबवला जातोय

कायदा आणि सुव्यवस्था आमच्या हातात आहे. त्यामुळं आम्ही सांगू तो कायदा, तो पोलिसांनी मानला पाहिजे असा प्रकारचा कायदा महाराष्ट्रात राबवला जात असल्याचा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला. विरोधकांना ठाण्यात टिपून टिपून मारत आहेत. मुख्यमंत्र्यांना वाटतंय आख्खं ठाणे माझ्या हातात असावं. एवढं वर्ष राजकारण केलं पवार साहेबांनी पण संपूर्ण बारामती त्यांची नाही होऊ शकली असेही आव्हाड यावेळी म्हणाले. 

महत्त्वाच्या बातम्या:

live reels News Reels

Jitendra Awhad : सुधांशू त्रिवेदींनी शिवाजी महाराजांची ‘ती’ पाच पत्रे दाखवावी, जितेंद्र आव्हाड यांचा हल्लाबोल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here