म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : वरळीच्या पोलिस वसाहतीमध्ये नुकतीच एक विचित्र घटना समोर आली. मुंबई पोलिस दलातील एका कॉन्स्टेबलला एका व्हॉट्सॲप ग्रुपवर त्याच्याच पत्नीची अश्लिल चित्रफीत हाती लागली. विशेष म्हणजे पत्नीसोबत असलेल्या तरुणही परिचयातील होता. याबाबत त्याने हटकताच पत्नीने पोलिसांत तक्रार करण्यास नकार दिला. अखेर बदनामी झाल्याप्रकरणी या पोलिस कॉन्स्टेबलनेच वरळी पोलिस ठाण्यात तक्रार केली. मात्र या घटनेमुळे वरळी पोलिस वसाहतीमध्ये खळबळ उडाली आहे.

वरळी पोलिस वसाहतीमध्ये वास्तव्यास असलेला एक पोलिस कॉन्स्टेबल एका व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये आहे. या ग्रुपमध्ये सव्वाशेपेक्षा अधिक सदस्य असून पाच डिसेंबर रोजी एका सदस्याने या ग्रुपमध्ये एक अश्लील चित्रफीत पोस्ट केली. कॉस्टेबलने ही चित्रफीत डाउनलोड करून पाहिली असता त्याला धक्काच बसला. यामध्ये त्याचीच पत्नी दुसऱ्या एका तरुणासोबत आक्षेपार्ह स्थितीमध्ये होती. या विचित्र परिस्थितीत काय करावे हे त्याला कळत नव्हते. अखेर त्याने याबाबत पत्नीला हटकले असता तिने अनैतिक संबंधातून त्या तरुणाने ही चित्रफीत तयार केली, असे मुळमुळीत उत्तर तिने दिले. या चित्रफितीमध्ये माझी आणि तुझी विनाकारक बदनामी झाली आहे त्यामुळे त्या तरुणाविरुद्ध तक्रार कर, असे कॉन्स्टेबलने पत्नीला सांगितले. मात्र तिने तक्रार करण्यास नकार दिला. पत्नीचा हा नकार म्हणजे त्याच्यासाठी दुसरा धक्का होता.

भारतीयांसमोर मोठं संकट; एकाच आजाराने तब्बल ६ कोटी लोक बाधित, १० टक्के लोकांना गंभीर संसर्ग

पोलिस कॉन्स्टेबलने संयम सोडता त्याच्या सासरच्या मंडळींना घरी बोलावले. त्यांना पत्नीचे सर्व प्रताप दाखवले आणि तिला घरी घेऊन जाण्यास सांगितले. पत्नीला माहेरी पाठविल्यानंतर कॉन्स्टेबलने वरळी पोलिस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी त्याच्या तक्रारीवरून पत्नी, तिच्यासोबत दिसणारा तरुण आणि व्हॉट्सॲप ग्रुपवर चित्रफीत पोस्ट करणाऱ्यांविरुद्ध अश्लील साहित्याचा प्रसार, अब्रुनुकसान आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here