Aurangabad Police Bharti: औरंगाबाद शहर आणि ग्रामीण पोलीस दलासाठी भरती प्रकिया सध्या सुरु आहे. यासाठी मोठ्या प्रमाणावर तरुणांनी अर्ज दाखल केली आहे. औरंगाबाद ग्रामीण पोलीस दलात एकूण 39 जागा भरल्या जाणार असून, यासाठी 5 हजार 725 अर्ज आले आहेत. विशेष म्हणजे यांत बीएचएमएस -एमडी, एमई, बीई, एलएल. एम.,एलएल. बी.,एमबीए, एमएस्सी, फार्मा पदवीधरकांसह तब्बल 1 हजार 661 उच्चशिक्षित तरुणांनी पोलीस भरतीसाठी अर्ज दाखल केले आहे. त्यामुळे यातून उच्चशिक्षितांची महाराष्ट्रातील बेरोजगारीचं चित्र पुन्हा एकदा समोर आले आहे. 

औरंगाबाद ग्रामीण पोलीस दलासाठी सद्या ग्रामीण पोलिस मुख्यालयाच्या गोकुळ क्रीडा मैदानावर भरती प्रक्रिया सुरू आहे. एकूण 39  पदांसाठी ही भरती असून, त्यात महिलांची 12  पदे आहेत. या 39 पदांसाठी 4 हजार 225 पुरुषांचे, तर 1 हजार 500 अर्ज महिलांचे आले आहेत. या भरतीला 2 जानेवारीपासून सुरवात झाली असून, कागदपत्रांची प्रत्यक्ष पडताळणी आणि मैदानी चाचणी घेण्यात येत आहे. यासाठी पहिल्याच दिवशी 500 जणांना बोलवण्यात आले होते. तर गेल्या तीन दवसांत 2  हजार 100  उमेदवारांना बोलवण्यात आले. मात्र प्रत्यक्षात 1 हजार 102  उमेदवार उपस्थित होते. ज्यातील 907 जण पात्र ठरले. मात्र यावेळी अर्ज केलेल्या उमेदवारांमध्ये उच्चशिक्षितांची मोठी संख्या पाहायला मिळत आहे. 

उमेदवार आणि पदव्या 
















अ.क्र. शिक्षण  उमेदवार संख्या 
01 बीएचएमएस-एमडी 01
02 एमई 03
03 बीई 37
04 बी-टेक 25
05 एमबीए 15
06 बी-फार्म 14
07 एम.कॉम. 27
08 एमएस्सी 35
09 एलएल.बी./ एलएल.एम. 02
10 बीएस्सी अग्रो  26
11 बीएसस्सी 407
12 बी. कॉम. 205
13 एमए  95
14 बीए  40

बेरोजगारीचा प्रश्न गंभीर

live reels News Reels

समोर आलेल्या आकडेवारीनुसार बीएचएमएस-एमडी आणि एलएल. बीसह एमबीए करणाऱ्या तरुणांनी देखील पोलीस भरतीसाठी अर्ज दाखल केला आहे. राज्यासह देशात वाढती बेरोजगारीचे हे चित्र असल्याचे यातून स्पष्ट होत आहे. नोव्हेंबर 2022 मध्ये 8 टक्क्यांवर असलेला बेरोजगारीचा दर डिसेंबर 2022 मध्ये 8.3 टक्के झाल्याचे सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमीची (सीएमआई) आकडेवारी सांगते. धक्कादायक म्हणजे ग्रामीण बेरोजगारीचा दर 7.44 टक्के असून, शहरी बेरोजगारीचा दर 10.09 टक्के झाला आहे. त्यामुळे मिळेल तो जॉबसाठी तरुणांची धरपड सुरु आहे. औरंगाबादच्या पोलीस भरतीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्या या तरुणांची शिक्षण पात्रता पाहिल्यास राज्यात बेरोजगारीचा प्रश्न किती गंभीर बनला आहे, हे स्पष्ट होते. 

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here