नवी दिल्ली: यांनी राज्यसभेचे सदस्य म्हणून शपथ घेताना दिलेल्या ‘जय भवानी, जय शिवाजी’ या घोषणेवरील आक्षेपानंतर राज्यातील राजकारण तापू लागले आहे. या वरून सत्ताधारी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपला घेरायला सुरुवात केल्यानंतर आता उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे अध्यक्ष यांनी यावर स्पष्टीकरण दिले आहे. ‘मी छत्रपती शिवाजी महाराज यांचा मोठा प्रशंसक असून मी माता भवानीचा उपासक आहे. सदस्यत्वाची शपथ घेत असताना कुणीही कोणहीती घोषणा देऊ नये अशी मी सदस्यांना आठवण करून देत होतो. यात अनादर करण्याचा कोणताही प्रयत्न नव्हता, असे स्पष्टीकरण अघ्यक्ष व्यंकय्या नायडू यांनी दिले आहे.

इंग्रजीतून खासदारकीची शपथ घेतल्यानंतर खासदार उदयनराजे भोसले यांनी ‘जय भवानी, जय शिवाजी’ अशी घोषणा दिली होती. त्यानंतर शपथ घेताना अशी घोषणा कोणीही उच्चारू नये, ते गैर आहे. फक्त शपथ तेवढी रेकॉर्डवर येईल अशी समज दिली होती.

वाचा:

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ट्विट करत भाजपला कोंडीत कडण्याचा प्रयत्न केला.छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वंशजांचा दिल्लीच्या दरबारात अपमान झाला की नाही, याचे प्रमाणपत्र कोणी द्यायचे,असा प्रश्न राऊत यांनी उपस्थित केला होता. भाजपचे या विषयावर तोंड बंद आंदोलन सुरू झाल्याचा टोलाही संजय राऊत यांनी लगावला होता. इतकेच नाही, तर संभाजी भिडे यांच्याकडून आतापर्यंत सांगली, सातारा बंदची घोषणा कशी नाही, असा प्रश्नही उपस्थित केला होता.

वाचा: … तर मी राजीनामा दिला असता- उदयनराजे

खासदार उदयनराजे भोसले यांनी मात्र सभागृहात आपला अपमान झाल्याच्या चर्चेला चुकीचे ठरवले आहे. राज्यसभेत छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान झालेला नाही.जर तसा अपमान झाला असता तर मी तेथेच खासदारकीचा राजीनामा दिला असता, असं उदयनराजे यांनी म्हटले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने राजकारण करू नका, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here