साहजिकच अजित पवार यांचे हे वक्तव्य नितेश राणे यांना चांगलेच झोंबले. त्यामुळे आता नितेश राणे यांनीही ट्विट करून अजित पवार यांच्यावर पलटवार केला आहे. लघूशंकेनी धरणाची उंची वाढवणारे धरणवीर यांनी मला देवाने दिलेल्या शरीरयष्टीवरून भाष्य केले यावरूनच त्यांची वैचारिक उंची कळाली व हे सिद्ध झाले की यांना ‘औरंग्यावरची ‘ टीका सहन होत नाही, म्हणूनच यांचे काका छत्रपती शिवाजी महारांजाच्या समाधीपुढे कधीही नतमस्तक झाले नाही, असे नितेश राणे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. त्यामुळे यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते काय प्रत्यु्त्तर देणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
यापूर्वीही नितेश राणे यांनी अजित पवार यांच्यावर टीका केली होती. होय आम्ही, हिंदवी स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांना धर्मवीरच म्हणणार. मी ही गोष्ट धरणवीर अजित पवार आणि त्यांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांना सांगत आहे. धरणवीरांना धर्मवीर ही पदवी कधीच कळणार नाही, असा टोला नितेश राणे यांनी लगावला होता.
अजित पवार आणखी काय म्हणाले?
छत्रपती संभाजी महाराजांसंदर्भात मी कोणतेही वादग्रस्त वक्तव्य केलेले नाही. स्वराज्यरक्षक ही संकल्पना व्यापक, सर्वसमावेशक आणि महाराजांच्या कार्यकर्तृत्वाला शोभणारी आहे. त्यामुळे स्वराज्यक्षक या भूमिकेवर मी आजही ठाम आहे. नागपूरातील अधिवेशनात सभागृहात माझ्या त्या भूमिकेवर कोणत्याही आमदाराने विरोध केला नाही. पण दोन दिवसांनंतर माझ्या वक्तव्याबाबत भाजपचे आंदोलन सुरु झाले. कारण भाजपच्या मंडळींचा सूत्रधार त्यादिवशी सभागृहात नव्हता, असा टोला अजित पवारांनी लगावला होता.
To the esy.es Webmaster, exact listed here: Link Text