Aurangabad Crime News: औरंगाबादच्या सिल्लोड शहरातील स्नेहनगर भागात एक धक्कादायक प्रकार समोर आला असून, गुन्ह्यात सहभाग नसतांना चोरीच्या प्रकरणात सहआरोपी केल्याने तरुणाने आत्महत्या (Suicide) केल्याचा गंभीर आरोप (Serious Allegation) मयताच्या वडिलांनी केल्याने खळबळ उडाली आहे. शेख इम्रान शेख इसाक असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. धक्कादायक म्हणजे पिशोर पोलीस ठाण्यातील दोन पोलीस कर्मचाऱ्यांकडून सतत पैश्यांची मागणी होत असल्याने इम्रान गेल्या काही दिवसांपासून मानसिक तणावात होता असाही आरोप त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी केला आहे. 

सिल्लोड शहरातील स्नेहनगर भागात राहणाऱ्या इम्रानने 3 जानेवारी रोजी आत्महत्या केली होती. दरम्यान दोन महिन्यांपूर्वी त्याच्याविरुद्ध पिशोर पोलिस ठाण्यात कलम 379 नुसार बैल चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र या चोरीच्या गुन्ह्यात पोलिसांनी त्याला कारण नसताना व त्यात सहभाग नसताना सहआरोपी केल्याच्या आरोप इम्रानच्या वडिलांनी केला आहे. तर गेल्या काही दिवसांपासून तो या कारणावरून अस्वस्थ होता आणि त्यातूनच त्याने टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केली असल्याचा आरोप इम्रानच्या वडिलांनी केला आहे. 

खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी… 

चोरीच्या गुन्ह्यात न्यायालयाने इम्रानला दोन महिन्यांपूर्वी जामीन दिला होता. मात्र दर शनिवारी आणि मंगळवारी त्याला पिशोर पोलीस ठाण्यात हजेरी लावण्याचे आदेशही दिले होते. पण आपला सहभाग नसतांना देखील खोटा गुन्हा दाखल झाला, विनाकारण पोलीस ठाण्याच्या खेट्या माराव्या लागत असल्याने तो डिफ्रेशनमध्ये गेला होता. त्यात पिशोर पोलिस ठाण्यातील एक महिला आणि एक पुरुष पोलीस कर्मचारी त्याला त्रास देत होते. पैसे दिले नाही तर आणखी खोटे गुन्हे दाखल करू, तुला मोक्का लावून गावातून हद्दपार करू, अशी धमकी देत होते. या सर्व त्रासाला कंटाळूनच त्याने आपला जीव दिला असल्याचा देखील आरोप करण्यात आला आहे. तर त्या दोन पोलिसांनीच त्याला आत्महत्येस प्रवृत्त केले आहे, असाही आरोप मयताच्या वडिलांनी केला आहे. 

live reels News Reels

पोलिसांविरोधात तक्रार…

दरम्यान, आपल्या मुलाची बदनामी झाल्यानेच त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याची तक्रार मयताचे वडील शेख इसहाक यांनी सिल्लोड शहर पोलीस ठाण्यात दिली आहे. त्यामुळे दोषी दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी शेख यांनी पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी आणि सिल्लोड शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत केली आहे. तर त्यांच्या तक्रारीनंतर योग्य ती चौकशी करून पुढील कारवाई करण्यात येईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. 

Aurangabad: आधी दारू पाजली, त्यानंतर गळ्यावर पाय ठेवून जीव घेतला; हत्या करतानाचे फोटोही काढले, औरंगाबादमधील धक्कादायक घटना

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here